Pages

  ट्रायकोडर्मा   ही एक उपयुक्त बुरशी असून, सेंद्रिय पदार्थांच्या सान्निध्यात चांगल्या प्रकारे वाढते. ही बुरशी मातीमध्ये वाढणारी, परोपजीवी तस...

ट्रायकोडर्माचा वापर

No comments:
 

 ट्रायकोडर्मा ही एक उपयुक्त बुरशी असून, सेंद्रिय पदार्थांच्या सान्निध्यात चांगल्या प्रकारे वाढते. ही बुरशी मातीमध्ये वाढणारी, परोपजीवी तसेच इतर **रोगकारक बुरशींवर जगणारी** आहे.

या बुरशीच्या ७० च्या आसपास प्रजाती आढळतात. त्यापैकी **ट्रायकोडर्मा व्हीरीडी या मोठ्या प्रमाणात जैविक नियंत्रणात वापरल्या जातात.

पावडर, द्र्व स्वरुपात ट्रायकोडर्मा बाजारात उपलब्ध आहे.



या उपलब्ध फ़ॉरम्युलेशन्सचा वापर एकात्मिक रोग व्यवस्थापनामध्ये **पीक लागवडीपासून बीज प्रक्रिया, आळवणी, शेणखत, सेंद्रिय खते, स्लरी तसेच ठिबक सिंचनाद्वारे देखील करता येतो**.


सध्याच्या कालावधीमध्ये सर्वत्र पेरणी, भाजीपाला पीक लागवडीचा हंगाम सुरु होत आहे. शेतीमध्ये जमिनीद्वारे, बियांमार्फत पसरणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी जमिनीत बियाणे व रोपांच्या मुळांच्या सान्निध्यात रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करावा लागतो. परंतु जमिनीत रासायनिक बुरशीनाशकांची कार्यक्षमता जास्त काळ टिकून राहत नाही तसेच त्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजिवांच्या कार्यक्षमतेवरदेखील विपरीत परिणाम होतो.

सेंद्रिय पीक पद्धतीमध्ये ट्रायकोडर्मा ही बुरशी मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

 बुरशीचे कार्य, वैशिष्ट्ये आणि रोग नियंत्रणातील महत्त्व:

.कापूस, कडधान्य, तेलबिया, भाजीपाला व ऊस अशा विविध पिकांवर सुरवातीच्या काळात मर, मूळकुज, कॉलररॉट, खोडकुज आणि जमिनीत वाढणारे अनेक बुरशीजन्य रोग आढळून येतात. बऱ्याचदा रोपवाटिकेतील रोपे अचानक माना टाकतात.

या रोगांसाठी फ्युजारियम, व्हर्टिसिलियम, रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा, पीथियम अशा बुरशी कारणीभूत असतात. त्यांच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकांचा वापर केला जात असला तरी पर्यावरणपूरक पर्याय म्हणून जैविक बुरशीनाशकांचा वापर फायदेशीर ठरतो.

यामध्ये ट्रायकोडर्मा बुरशी उपयुक्त ठरते. ही बुरशी बियाण्यांवर रोग पसरवणाऱ्या बुरशींची वाढ होऊ देत नाही. 

ट्रायकोडर्माची कार्यपद्धती

  • ट्रायकोडर्मा ही बुरशींच्या धाग्यांना विळखा घालून, त्यातील पोषक द्रव्य शोषून घेते. परिणामी रोगकारक बुरशींमध्ये कार्बन, नायट्रोजन, जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होते. त्यांची वाढ खुंटते.
  • ही बुरशी ग्लायटॉक्झिन व व्हीरिडीन नावाचे प्रतीजैविक निर्माण करते. ते रोगकारक बुरशीना मारक ठरते.
  • ट्रायकोडर्मा बुरशी मातीतील सेंद्रिय पदार्थ कुजण्याकरिता सुद्धा उपयोगी ठरते.
  •  

    ट्रायकोडर्माचे फायदे

  • ट्रायकोडर्मा या बुरशींची बीजप्रक्रिया केल्यामुळे उगवणशक्ती वाढण्यास मदत होते.
  • रोगकारक बुरशींचा नायनाट होतो. पिकांच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत संरक्षण करते.
  • जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कुजवण्यास मदत होते. रते. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
  • No comments:

    Post a Comment