Pages

  *उसाला कोणते कोणते जीवाणू वापरता येतात?* *१. ट्रायकोडर्मा:*  ट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये ...

उसाला कोणते कोणते जीवाणू वापरता येतात?

No comments:
 

 *उसाला कोणते कोणते जीवाणू वापरता येतात?*

*१. ट्रायकोडर्मा:* ट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते. ती रोपांच्या मुळांवर पातळ थरांमध्ये वाढताना रोपाच्या वाढीसाठी आवश्यक ती वाढवर्धक द्रव निर्माण करते. मुळांची लांबी व संख्या वाढून रोपांची वाढ जोमदार होते. मुळांवर पातळ थरामुळे रोगकारक बुरशींना मुळांपर्यंत पोचता येत नाही. म्हणजेच रोपांचे रोगांपासून रक्षण होते. पिकातील अँटिऑक्सिडेंट क्रियांचे प्रमाण वाढवते. ट्रायकोडर्मा ही जमिनीतील वेगवेगळ्या बुरशींना विळखा घालून त्यातील पोषक द्रव्य शोषून घेते. परिणामी, रोगकारक बुरशीमध्ये कार्बन, नायट्रोजन, जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होते. ट्रायकोडर्मा हे ग्लायटॉक्झिन व व्हिरिडीन नावाचे प्रतिजैविक मातीमध्ये निर्माण करतात. त्यामुळे रोगकारक बुरशीचे प्रमाण कमी होते.

      

*२. सुडोमोनास:*

सुडोमोनास फ्लुरोसन्स मधे स्फुरद विरघळवण्याची देखिल क्षमता आहे. तसेच हा जीवाणू वाढीसाठी नत्राचा वापर करत असल्याने जमिनीत असलेला अतीरिक्त नत्र संपवण्याची देखिल त्यात क्षमता आहे. सुडोमानास फ्लुरोसन्स द्वारा स्रवण्यात येणाऱ्या पायरोल्नीट्रिन, पायोल्युट्युरिन आणि २,४ डायअँसेटिल फ्लोरोग्लुसीनोल (pyrronitrin, pyoluteorin, and 24- diacetyiphloroglucinol) या एन्टिबायोटिक द्रव्यांमुळे पिकासाठी हानीकारक असणाऱ्या जीवाणूंचा तसेच बुरशींचा नायनाट होतो. सुडोमोनास फ्लु. हायड्रेजन सायनामाईड आणि काही साईडोफोआर्स पायोकेलाईन आणि पायोव्हरडाईन (siderophores pyocheline and pyoverdine) स्रवते, ज्यामुळे मर्यादित अशा लोह (फेरस) च्या स्रोतांसाठी सुडोमोनास फ्लुरोसन्स ह्या साईड्रोफोअर्स मुळे एक प्रबळ दावेदार ठरुन स्पर्धत इतर जीवाणूंना मागे टाकुन त्यांच्या वर स्पर्धेतुन विजय प्राप्त करतो. सुडोमोनास फ्लुरोसन्स काही एक्झोपॉलीसॅकाराईडस (exopolysaccharides) देखिल स्रवते ज्यामुळे त्याच्या वर हल्ला करणारे व्हायरस, पाण्याची कमतरता तसेच ज्यावर हल्ला करायचा आहे अशा होस्ट (Host) च्या प्रतिकारक शक्ती विरोधात देखिल लढण्याची क्षमता यात असते.

 

*३. अझोटोबक्टर:*

अ‍ॅझोटोबॅक्टर हा जीवाणू जमिनीतील नत्र  जे ऑक्सिजनच्या उपस्थितीत वातावरणातील नायट्रोजनचे निराकरण करते. हे ऊस आणि बीट पिकांसाठी योग्य आहे.

 

*४. पी.एस.बी:*

पी.एस.बी.  जीवाणू जमिनीत असलेल्या अजैविक अघुलनशील फॉस्फरसचे विरघळवते आणि ते झाडांना उपलब्ध करून देते. हे विशेषत कडधान्यांसाठी फायदेशीर आहे आणि सर्व पिकांमध्ये आणि सर्व हवामानात उपयुक्त आहे.

 

*५. के.एम.बी:*

पोटॅश मोबिलायझिंग बायोफर्टिलायझर हे जैव खत आहे जे जमिनीत पोटॅशियमची उपलब्धता वाढवते. हे सर्व पिकांमध्ये आणि सर्व जमिनीत फायदेशीर आहे.

 

*६. बिव्हेरिया+ मेटाराझीयम:*

हे जीवाणू व्हर्तीसिलीयम + बिव्हेरिया+ मेटाराझीयम यांचा उपयोग हुमणीला रोखण्यासाठी होतो. तसेच मावा, तुडतुडे सुद्धा यांच्या फवारणीने रोखता येतात.

 

७. *व्हर्तीसिलीयम:*

ऊसाच्या कांड्यावरील मिलीबग साठी वापरता येते.

No comments:

Post a Comment