Pages

  1.ऊस तुटून गेल्यावर पाचट एकसारखे पसरून घ्यावे म्हणजे पाचट व्यवस्थापन करणे सोपे जाते. 2.पाचट कुट्टी मशीनच्या साह्याने बारीक करावे. 3.पाचट ब...

 1.ऊस तुटून गेल्यावर पाचट एकसारखे पसरून घ्यावे म्हणजे पाचट व्यवस्थापन करणे सोपे जाते.

2.पाचट कुट्टी मशीनच्या साह्याने बारीक करावे.
3.पाचट बारीक झाल्यावर त्यावरती एक पोते युरिया दोन पोते सिंगल सुपर फॉस्फेट असे एक एकर साठी पसरून फेकावे. नंतर चार किलो पाचट कुजवनारे जिवाणू टाकावे किंवा लिक्विड जिवाणू दोन लिटर टाकावे.



4.ऊसाचे बुडखे चुकून राहिल्यास कोयत्याने कडून टाकावे.
5.सर्व काम झाल्यावर स्प्रिंकलर ने किंवा पाठपाणी देऊन घ्या.
6.अशा पद्दतीने काम केल्यास साडेचार ते पाच महिन्यात पाचट पूर्णपणे कुजून सेंद्रिय खत तयार होते.
7.तसेच पाचट लवकर कुजविण्यासाठी साखर कारखाण्यातील प्रेसमड कंपोस्ट एकरी एक टन पाचटावर टाकवे.
8.नांगराच्या साहयाने पलटी दिल्यास पाचट दोन ते तीन महिन्यात चांगले कुजले जाते.

  ट्रायकोडर्मा   ही एक उपयुक्त बुरशी असून, सेंद्रिय पदार्थांच्या सान्निध्यात चांगल्या प्रकारे वाढते. ही बुरशी मातीमध्ये वाढणारी, परोपजीवी तस...

 ट्रायकोडर्मा ही एक उपयुक्त बुरशी असून, सेंद्रिय पदार्थांच्या सान्निध्यात चांगल्या प्रकारे वाढते. ही बुरशी मातीमध्ये वाढणारी, परोपजीवी तसेच इतर **रोगकारक बुरशींवर जगणारी** आहे.

या बुरशीच्या ७० च्या आसपास प्रजाती आढळतात. त्यापैकी **ट्रायकोडर्मा व्हीरीडी या मोठ्या प्रमाणात जैविक नियंत्रणात वापरल्या जातात.

पावडर, द्र्व स्वरुपात ट्रायकोडर्मा बाजारात उपलब्ध आहे.



या उपलब्ध फ़ॉरम्युलेशन्सचा वापर एकात्मिक रोग व्यवस्थापनामध्ये **पीक लागवडीपासून बीज प्रक्रिया, आळवणी, शेणखत, सेंद्रिय खते, स्लरी तसेच ठिबक सिंचनाद्वारे देखील करता येतो**.


सध्याच्या कालावधीमध्ये सर्वत्र पेरणी, भाजीपाला पीक लागवडीचा हंगाम सुरु होत आहे. शेतीमध्ये जमिनीद्वारे, बियांमार्फत पसरणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी जमिनीत बियाणे व रोपांच्या मुळांच्या सान्निध्यात रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करावा लागतो. परंतु जमिनीत रासायनिक बुरशीनाशकांची कार्यक्षमता जास्त काळ टिकून राहत नाही तसेच त्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजिवांच्या कार्यक्षमतेवरदेखील विपरीत परिणाम होतो.

सेंद्रिय पीक पद्धतीमध्ये ट्रायकोडर्मा ही बुरशी मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

 बुरशीचे कार्य, वैशिष्ट्ये आणि रोग नियंत्रणातील महत्त्व:

.कापूस, कडधान्य, तेलबिया, भाजीपाला व ऊस अशा विविध पिकांवर सुरवातीच्या काळात मर, मूळकुज, कॉलररॉट, खोडकुज आणि जमिनीत वाढणारे अनेक बुरशीजन्य रोग आढळून येतात. बऱ्याचदा रोपवाटिकेतील रोपे अचानक माना टाकतात.

या रोगांसाठी फ्युजारियम, व्हर्टिसिलियम, रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा, पीथियम अशा बुरशी कारणीभूत असतात. त्यांच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकांचा वापर केला जात असला तरी पर्यावरणपूरक पर्याय म्हणून जैविक बुरशीनाशकांचा वापर फायदेशीर ठरतो.

यामध्ये ट्रायकोडर्मा बुरशी उपयुक्त ठरते. ही बुरशी बियाण्यांवर रोग पसरवणाऱ्या बुरशींची वाढ होऊ देत नाही. 

ट्रायकोडर्माची कार्यपद्धती

  • ट्रायकोडर्मा ही बुरशींच्या धाग्यांना विळखा घालून, त्यातील पोषक द्रव्य शोषून घेते. परिणामी रोगकारक बुरशींमध्ये कार्बन, नायट्रोजन, जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होते. त्यांची वाढ खुंटते.
  • ही बुरशी ग्लायटॉक्झिन व व्हीरिडीन नावाचे प्रतीजैविक निर्माण करते. ते रोगकारक बुरशीना मारक ठरते.
  • ट्रायकोडर्मा बुरशी मातीतील सेंद्रिय पदार्थ कुजण्याकरिता सुद्धा उपयोगी ठरते.
  •  

    ट्रायकोडर्माचे फायदे

  • ट्रायकोडर्मा या बुरशींची बीजप्रक्रिया केल्यामुळे उगवणशक्ती वाढण्यास मदत होते.
  • रोगकारक बुरशींचा नायनाट होतो. पिकांच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत संरक्षण करते.
  • जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कुजवण्यास मदत होते. रते. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
  •   *उसाला कोणते कोणते जीवाणू वापरता येतात?* *१. ट्रायकोडर्मा:*  ट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये ...

     *उसाला कोणते कोणते जीवाणू वापरता येतात?*

    *१. ट्रायकोडर्मा:* ट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या मुळालगत (रायझोस्फियर) मध्ये काम करते. ती रोपांच्या मुळांवर पातळ थरांमध्ये वाढताना रोपाच्या वाढीसाठी आवश्यक ती वाढवर्धक द्रव निर्माण करते. मुळांची लांबी व संख्या वाढून रोपांची वाढ जोमदार होते. मुळांवर पातळ थरामुळे रोगकारक बुरशींना मुळांपर्यंत पोचता येत नाही. म्हणजेच रोपांचे रोगांपासून रक्षण होते. पिकातील अँटिऑक्सिडेंट क्रियांचे प्रमाण वाढवते. ट्रायकोडर्मा ही जमिनीतील वेगवेगळ्या बुरशींना विळखा घालून त्यातील पोषक द्रव्य शोषून घेते. परिणामी, रोगकारक बुरशीमध्ये कार्बन, नायट्रोजन, जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होते. ट्रायकोडर्मा हे ग्लायटॉक्झिन व व्हिरिडीन नावाचे प्रतिजैविक मातीमध्ये निर्माण करतात. त्यामुळे रोगकारक बुरशीचे प्रमाण कमी होते.

          

    *२. सुडोमोनास:*

    सुडोमोनास फ्लुरोसन्स मधे स्फुरद विरघळवण्याची देखिल क्षमता आहे. तसेच हा जीवाणू वाढीसाठी नत्राचा वापर करत असल्याने जमिनीत असलेला अतीरिक्त नत्र संपवण्याची देखिल त्यात क्षमता आहे. सुडोमानास फ्लुरोसन्स द्वारा स्रवण्यात येणाऱ्या पायरोल्नीट्रिन, पायोल्युट्युरिन आणि २,४ डायअँसेटिल फ्लोरोग्लुसीनोल (pyrronitrin, pyoluteorin, and 24- diacetyiphloroglucinol) या एन्टिबायोटिक द्रव्यांमुळे पिकासाठी हानीकारक असणाऱ्या जीवाणूंचा तसेच बुरशींचा नायनाट होतो. सुडोमोनास फ्लु. हायड्रेजन सायनामाईड आणि काही साईडोफोआर्स पायोकेलाईन आणि पायोव्हरडाईन (siderophores pyocheline and pyoverdine) स्रवते, ज्यामुळे मर्यादित अशा लोह (फेरस) च्या स्रोतांसाठी सुडोमोनास फ्लुरोसन्स ह्या साईड्रोफोअर्स मुळे एक प्रबळ दावेदार ठरुन स्पर्धत इतर जीवाणूंना मागे टाकुन त्यांच्या वर स्पर्धेतुन विजय प्राप्त करतो. सुडोमोनास फ्लुरोसन्स काही एक्झोपॉलीसॅकाराईडस (exopolysaccharides) देखिल स्रवते ज्यामुळे त्याच्या वर हल्ला करणारे व्हायरस, पाण्याची कमतरता तसेच ज्यावर हल्ला करायचा आहे अशा होस्ट (Host) च्या प्रतिकारक शक्ती विरोधात देखिल लढण्याची क्षमता यात असते.

     

    *३. अझोटोबक्टर:*

    अ‍ॅझोटोबॅक्टर हा जीवाणू जमिनीतील नत्र  जे ऑक्सिजनच्या उपस्थितीत वातावरणातील नायट्रोजनचे निराकरण करते. हे ऊस आणि बीट पिकांसाठी योग्य आहे.

     

    *४. पी.एस.बी:*

    पी.एस.बी.  जीवाणू जमिनीत असलेल्या अजैविक अघुलनशील फॉस्फरसचे विरघळवते आणि ते झाडांना उपलब्ध करून देते. हे विशेषत कडधान्यांसाठी फायदेशीर आहे आणि सर्व पिकांमध्ये आणि सर्व हवामानात उपयुक्त आहे.

     

    *५. के.एम.बी:*

    पोटॅश मोबिलायझिंग बायोफर्टिलायझर हे जैव खत आहे जे जमिनीत पोटॅशियमची उपलब्धता वाढवते. हे सर्व पिकांमध्ये आणि सर्व जमिनीत फायदेशीर आहे.

     

    *६. बिव्हेरिया+ मेटाराझीयम:*

    हे जीवाणू व्हर्तीसिलीयम + बिव्हेरिया+ मेटाराझीयम यांचा उपयोग हुमणीला रोखण्यासाठी होतो. तसेच मावा, तुडतुडे सुद्धा यांच्या फवारणीने रोखता येतात.

     

    ७. *व्हर्तीसिलीयम:*

    ऊसाच्या कांड्यावरील मिलीबग साठी वापरता येते.

    शेतकरी बांधवांनो, कोणतेही पीक असेल जसे कि, मिरची, टोमॅटो, वांगी, वेलवर्गीय किंवा डाळिंब, पपई तर या पिकांपासून भरघोस उत्पादन घ्या...


    शेतकरी बांधवांनो, कोणतेही पीक असेल जसे कि, मिरची, टोमॅटो, वांगी, वेलवर्गीय किंवा डाळिंब, पपई तर या पिकांपासून भरघोस उत्पादन घ्यायचे असेल तर पिकाची फुलधारणेच्या अवस्थेत अधिक काळजी घेऊन पीक व्यवस्थापन उत्तम करणे गरजेचे असते. तर आज आपण पिकामध्ये अधिक फुलधारणा होण्यासाठी शेतकऱ्यांच्या पसंतीस पडलेल्या एक उत्तम जीवाणू प्रॉडक्ट म्हणजेच फोस्फोपिक बद्दल जाणून घेऊया.
    .
    *फोस्फोपिकचे फायदे:*
    • अधिक फुलधारणेसह फुल व फळगळ रोखते.
    • मादी फुलांच्या विकासामुळे फळधारणेचे प्रमाण वाढते.
    • फळांचे वजन, आकार, रंग व चकाकी वाढविते.
    • फुले व फळांची टिकवण क्षमता वाढविते.
    • गुणवत्तापूर्ण व भरघोस उत्पादनासाठी अत्यंत फायदेशीर.
    .
    वापराचे प्रमाण
    १ लिटर / १ एकर ड्रीपसाठी किंवा आळवणी साठी
    .
    .
    शिफारस केलेली पिके
    सर्व भाजीपाला, फुल, फळपिके तसेच नगदी पिके.
    .
    *कधी वापरावे?*
    उत्तम परिणामांसाठी सकाळी लवकर किंवा सायंकाळी ड्रीप ने सोडावे.
    .
    *उपलब्धता*
    1 लिटर, 5 लिटर, १ किलो

    खरेदी करण्यासाठी / अधिक माहितीसाठी संपर्क 📲- *पीक कृषी कोल्हापूर 9146150117