Pages

कापूस पिकामध्ये फरदड किंवा पुर्नबहार नियोजन करत असताना आधीच्या पिकात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव असल्यास कापूस फरदड घेणे टाळावे.  खरिफ मधी...

कापूस पिकातील पुर्नबहार/फरदड नियोजन!

No comments:
 

  • कापूस पिकामध्ये फरदड किंवा पुर्नबहार नियोजन करत असताना आधीच्या पिकात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव असल्यास कापूस फरदड घेणे टाळावे. 
  • खरिफ मधील कापूस वेचणी करताना कीड रोग ग्रस्त व अपरिपक्व बोंडे काढून टाकावीत व कपाशीची 5 फुटापेक्षा जास्त वाढ झाली असल्यास थोडा शेंडा खुडावा जेणेकरून बाजूने नवीन फुटवे व पात्यांची संख्या वाढेल. 
  • तसेच तण नियंत्रण करून जमीन भुसभुशीत करण्यासाठी हलकी वखरणी करावी. 
  • तणविरहित शेतामध्ये खतांची मात्रा द्यावी. यामध्ये 10:26:26 - 50 किलो, युरिया 25 किलो, मॅग्नेशिअम सल्फेट 10 किलो, ह्युमिक 500 ग्रॅम /एकर व सल्फर मॅक्स 3 किलो एकरी द्यावे. 
  • खतांची मात्रा दिल्यानंतर पिकास दुसऱ्या दिवशी मुबलक प्रमाणात पाणी द्यावे. 


No comments:

Post a Comment