Pages

चवळी किडी व त्यांचे नियंत्रण मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते, पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत या पिकाची ल...

चवळी किडी व त्यांचे नियंत्रण

  • मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते, पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी.
  • उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी.
  • हेक्टरी ५ टन शेणखत/कंपोस्ट खत द्यावे. मृगाचा पाऊस झाल्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात.
  • जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्यात पेरणी योग्य पाउस होताच वाफसा आल्यावर पेरणी करावी.


हेक्टरी बियाणे प्रमाण
चवळी १५ ते २० किलो.

पेरणीचे अंतर
दोन ओळीत ४५ सें.मी. व दोन रोपात १० सें.मी. ठेवावे.

बीजप्रक्रिया
२५० ग्रॅम रायझोबियम जीवाणुसंवर्धन १० ते १५ किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.
२५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद या प्रमाणे रासायनिक खताची मात्रा द्यावी, म्हणजेच १२५ किलो डीएपी प्रती
हेक्टर प्रमाणे पेरणी करतांना खत द्यावे.
पीक २०-२५ दिवसांचे असताना पहिली कोळपणी आणि ३०-३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी.
पेरणीनंतर ३० ते ४५ दिवस पीक तणविरहीत ठेवावे.

NPK हे पिकाच्या वाढीसाठी महत्वाचे पोषक घटक असून त्याची पिकांना गरज असते हे घटक शेतातील मातीतून मिळत असतात त्याच बरोबर आपण काही रासायनिक आणि ...

NPK हे पिकाच्या वाढीसाठी महत्वाचे पोषक घटक असून त्याची पिकांना गरज असते हे घटक शेतातील मातीतून मिळत असतात त्याच बरोबर आपण काही रासायनिक आणि सेंद्रिय खताद्वारे हि देण्यात येतात. हे घटक इतके महत्वाचे असतात कि यांच्याशिवाय पिकांची नीट वाढ होऊ शकत नाही. NPK मधला प्रत्येक घटक वेगवेगळी जबाबदारी पार पाडत असतो. ती आपण आता खालील प्रमाणे विस्तृतरित्या पाहू. 



नत्र Nitrogen (N): 

  • पिकातील नायट्रोजनच्या योग्य उपलब्धतेनुसार पिकातील हरितद्रव्यांचे प्रमाण वाढते. 
  • तसेच लूसलुसीत तजेलदार ठेवण्याचे काम नायट्रोजन करतो. 
  • तसेच नायट्रोजनमुळे पिकांची शाखीय वाढ मोठ्या प्रमाणात होते. 


स्फुरद Phosphorus (P) :

  • स्फुरद हा घटक पिकांच्या मूळ वाढीसाठी त्याच बरोबर फुलं आणि फळं वाढीसाठी गरजेचं असतो.  पिकातील फोस्फारसच्या उपलब्धतेमुळे पिकांच्या मुळांची वाढ चांगली होते.  पिकास फुटवे मोठ्या प्रमाणात फुटतात.
  • त्याचबरोबर पिकाच्या खोडाला चांगली ताकद येते. त्यामुळे झाड पडत नाही किंवा कोलमडत नाही. 
  •  नैसर्गिकरित्या फळे व्यवस्थित पिकण्यात मदत होते. 
  •  पिकाची रोगरीत्या शक्ती वाढवून पिकाची मुळावरील डायझोबियमच्या गाठी वाढविण्यास मदत होते. 


पालाश Potassium (K):

  •  पिकांच्या पानामध्ये छोटे-छोटे छिद्र असतात हि छोटी छिद्र प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी उघड – बंद होत असतात ज्याच्या वाटे पिके कार्बन डायॉक्साइड घेऊन आक्सीजन तयार करण्याचे काम करत असतात.
  • पिकांना पालाश योग्य प्रमाणात दिल्यास हि छोटी छिद्र योग्य प्रकारे उघड-बंद होतात आणि प्रकाश संश्लेषण क्रियेचे काम योग्य प्रकारे होते.
  • या पाना वाटे तयार झालेले अन्न योग्य त्या ठिकाणी पोहोचवण्याचे कार्य पालाश करत असते. त्याचबरोबर झाडाची अन्न तयार करण्यासाठी क्षमता वाढते. 
  •  उदा. ऊसाच्या पानांमधून तयार झालेले अन्न उसाच्या पेरा मध्ये रूपांतरित होते. पालाश योग्य प्रमाणात पिकास मिळाल्यास फळ आणि बिया उत्तम प्रतीच्या बनत असतात. पालाशमुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

आमची उत्पादने वापरून आपण NPK अपटेक वाढवू शकता. जी खते पिकांना मिळत नाहीत त्या खताना फोडण्याचे काम आपले प्रॉडक्ट करत असतात.

आपण प्लॅनिंग नुसार आमच्या प्रोडकटचा वापर केल्यास 25-40% पर्यंत रासायनिक खते कमी करू शकता.

आधीक माहितीसाठी

पीक लॅब कोल्हापूर

संपर्क 9146150117

मका किडी व त्यांचे नियंत्रण मका पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान मका हे महाराष्ट्र राज्याचे महत्वाचे पिक असुन या पिकाखाली सुमारे 7.08 लक्ष हेक्टर क...

मका किडी व त्यांचे नियंत्रण


मका पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान

मका हे महाराष्ट्र राज्याचे महत्वाचे पिक असुन या पिकाखाली सुमारे 7.08 लक्ष हेक्टर क्षेत्र आहे.पिकाची सरासरी हेक्टरी उत्पादकता 1928 किलो प्रती हेक्टर व उत्पादन 13.65 लक्ष टन आहे.

लागवडीसाठी जमीन कशी असावी
तृणधान्य पिकांच्या उत्पादमध्ये गहू व भात या पिकांनंतर मक्याचा जगात तिसरा क्रमांक लागतो. अन्नधान्याव्यतिरीक्त मक्याचा उपयोग लाह्या, ब्रेड, स्टार्च, सायरप, अल्कोहोल, अँसिटीक व लॅटीक अँसिड, ग्लुकोज, डेक्स्ट्रोज, प्लॅस्टीक धागे, गोंद, रंग, कृत्रिम रबर, रेग्जीन तसेच बुट पॉलीश इत्यादी विविध पदार्थ तयार करण्याकरीता होतो.

हवामान
1. मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि शीत (थंड) अशा वेगवेगळ्या हवामानाशी समरस होण्याची क्षमता असणारे पीक आहे.
2. समुद्र सपाटीपासून ते २७०० मीटर उंचीच्या ठिकाणी देखील मका लागवड करता येते.
3. परंतू पीक वाढीच्या कोणत्याही काळात धुक्याचे हवामान मक्या समानवत नाही4. मका उगवणीसाठी १८ डिग्री सेल्सियस तापमान योग्य असून, त्यापेक्षा कमी तापमान असल्यास थंड आणि ओलसर पणामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊन पीकाच्या उगवणीवर प्रतिकुल परिणाम होतो.
5. मका पिकाची योग्य वाढीसाठी २५ ते ३० डिग्री सेल्सियस तापमान चांगले असते परंतु जेथे सौम्य तापमान (२० ते २५ डिग्री सेल्सियस) आहे अशा ठिकाणी मका वर्षभर घेता येतो.6. ३५ डिग्री सेल्सियस पेक्षा अधिक तापमान असल्यास पीक उत्पादनात घट येते. परागीभावानाच्या वेळी अधिक तापमान आणि कमी आद्रता असल्यास त्याचा विपरीत परिणाम परागीभवन व फलधारणेवर होऊन उत्पादनात घट येते.


1. मक्यासाठी मध्यम तेभारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची, अधिक सेंद्रिय पदार्थ आणि जलधारणा शक्ती असलेली जमीन चांगली.
2. विशेषतः नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत हे पीक फार चांगले येते.
3. परंतु अधिक आम्ल ( सामू ४.५ पेक्षा कमी) आणि चोपण अगर क्षारयुक्त ( ८.५पेक्षा अधिक सामू) जमिनीत मका घेऊ नये.
4. तसेच दलदलीची जमीनसुद्धा टाळावी.
5. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान असावा.

पूर्वमशागत 
1. जमिनीची खोल ( १५ते२०सें. मी.) नांगरट करावी. पिकाची धसकटे, अवशेष, काडीकचरा इत्यादी खोल नांगरटीमुळे जमिनीत गाइल्याने जमिनीत सेंद्रिय पदार्थ मिळतो व जमिनीचा पोत सुधारतो.
2. कुळवाच्या २-३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
3. शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी हेक्टरी १० ते १२ टन (२५ ते३० गाडया) चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळावे. हिरवळीचे खत जमिनीत गाडले असल्यास शेणखताची आवश्यकता भासत नाही.

 सुधारित वाण :
1. सुधारित वाणांचा वापर केल्यास अधिक उत्पादन मिळते.
2. मक्याच्या संमिश्र व संकरीत जाती या स्थानिक वाणांपेक्षा ६० ते ८० टक्के अधिक उत्पादन देतात.
3. विविध कालावधीमध्ये पक्व होणाऱ्या मक्याच्या संमिश्र व संकरीत जाती उपलब्ध असून पाऊस आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य वाणाची निवड करावी.

पेरणीची वेळ 
1. मका हे खरिप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात घेतलेजाते.
2. खरिप हंगाम : जून ते जुलै २ रा आठवडा खरिपातील पेरणीस उशीर करू नये, कारण उशीर झाल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रोपांची संख्या योग्य राहत नाही.
3. रब्बी हंगाम : १५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर
4. उन्हाळी हंगाम : जानेवारी ते फेब्रुवारी २ रा आठवडा
5. धान्य पीकासाठी १५-२० किलो बियाणे प्रती हेक्टरी
6. चारा पीकासाठी 75 किलो बियाणे प्रती हेक्टरी

पेरणीची पद्धत
1. टोकण पद्धतीने पेरणी करावी.
2. सरी वरंब्यावर पेरणी करावयाची असल्यास सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूला जातीपरत्वे अंतर ठेऊन पेरणी करावी.
3. उशिरा आणि मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या जातींसाठी ७५ सें.मी. अंतरावर मार्करच्या साह्याने ओळी आखून २० ते २५ सें.मी. अंतरावर टोकण करावी.
4. लवकर तयार होणाऱ्या जातींसाठी दोन ओळींत ६० सें.मी. व दोन रोपांत २० सें.मी. अंतर ठेवून वरीलप्रमाणे टोकण करावी.
5. रब्बी हंगामात मक्याची पेरणी ६० सें. मी. अंतरावर काढलेल्या सरीच्या बगलेत निम्म्या उंचीवर एका बाजूला २० सें. मी. अंतरावर २ बिया ४-५ सें. मी. खोल टोकण करून करावी.
6. एक हेक्टर पेरणीसाठी १५-२० किलो बियाणे लागते.
7. अश्याप्रकारे काढणीच्या वेळी प्रति हेक्टरी ९०,००० रोप संख्या मिळते व परिणामी अधिक उत्पन्न मिळते.

आंतरपीक पद्धती
1. खरिप हंगामात मक्याच्या दोन ओळीत असलेल्या जागेत लवकर येणारी कडधान्ये उडीद, मुग, चवळी आणि तेलबिया (भुईमुग, सोयाबीन) हि आंतरपिके यशस्वीरित्या घेता येतात.
2. आंतरपीक पद्धतीत ६ : ३ ओळी या प्रमाणात घेणे फायदेशीर आहे.
3. मक्यात भुईमुग हे आंतरपीक जोडओळ किंवा सोडओळ पद्धतीने घेता येते.
4. रब्बी हंगामात मक्यामध्ये करडई, कोथिंबीर आणि मेथी हि आंतरपिके भाजीपाल्यासाठी घेणे फायदेशीर आहे.
5. मक्याची लवकर येणारा वाण ऊस व हळदीमध्ये मिश्र पीक म्हणून घेता येते परंतु अशा आंतरपीक पद्धतीमुळे मुख्य पिकाच्या उत्पादनात घट येते. त्यासाठी मुख्य पिकास व अंतर पिकास शिफारशीत खतमात्रा देणे गरजेचे आहे.
6. मका हे मिश्र पीक मुख्यतः हिरवी कणसे आणि चारा यासाठी घेतात.

बीजप्रक्रीया
1. पेरणीपूर्वी २ ते २.५ ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास चोळावे, म्हणजे करपा रोगाचे नियंत्रण करता येते.
2. तसेच अझोटोबक्टर जीवाणू संवर्धन २५ ग्रॅम किंवा 100 मिली प्रति किलो बियाण्यास लावून नंतर पेरणी करावी.

खते
1. तूर पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी 75 किलो नत्र व 75 किलो स्फुरद व 75 किलो पालाश द्यावे.
2. पेरणीनंतर एक महिन्याने 75 किलो नत्र द्यावे.
3. जस्ताची कमतरता असल्यास प्रति हेक्टरी २० ते २५ किलोग्रॅम झिंक सल्फेट पेरणीच्यावेळी द्यावे.


आंतरमशागत
अ) पक्षी राखण :

1. खरिप हंगामात पेरणीनंतर उगवण ५-६ दिवसात तर रब्बी हंगामात ८ ते १० दिवसात होते.
2. पीक उगवत असताना पक्षी कोवळे कोंब उचलतात परिणामी रोपांची संख्या कमी होऊन उत्पादन घटते म्हणून पेरणीनंतर सुरवातीच्या १०-१२ दिवसापर्यंत पक्ष्यापासून राखण करणे अत्यंत महत्वाचे आहे.
3. तसेच पीक दुधाळ अवस्थेत असताना पक्षी कणसे फोडून दाणे खातात म्हणून अश्यावेळी देखील पक्षी राखण आवश्यक असते.
ब) नांग्या भरणे/ विरळणी करणे :
मका उगवणीनंतर ८-१० दिवसांनी विरळणी करून एका चौफुल्यावर एकच जोमदार रोप ठेऊन विरळणी करावी. गरज भासल्यास पीक उगवणीनंतर त्वरित नांग्या भराव्यात.
क) पिकात ज्यादा पाणी किंवा दलदल नसावी :
मक्याची रोपावस्था ज्यादा पाणी किंवा दलदलीच्या स्थितीस खूपच संवेदनशील आहे म्हणून पेरणीनंतरच्या सुरवातीच्या २० दिवसापर्यंतच्या काळात पिकात पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.ड) तणनियंत्रण / भर देणे:
1. तण नियंत्रणासाठी अट्राटाप ५० टक्के हेक्टरी २ ते २.५ किलो पेरणी संपताच ५०० लिटर पाण्यात मिसळून समप्रमाणात जमिनीवर फवारावे
2. तसेच तणांच्या प्रादुर्भावानुसार मका वाढीच्या सुरवातीच्या काळात एक ते दोन खुरपण्या करून ताटाना आधारासाठी माती चढवावी. गरजेनुसार एक ते दोन कोळपण्या कराव्यात.

सिंचन:
1. मक्याची पाने रुंद व लांब असतात. बाष्पीभवन क्रियेमुळे पानातून अधिक पाणी बाहेर टाकले जात असल्याने या पिकास पाण्याची गरज अधिक आहे.
2. खरिप हंगामात निश्चित आणि विस्तृतपणे पावसाची विखरण असणाऱ्या भागात मका पिक जिरायती खाली घेता येते
3. मका पीक पाण्याच्या ताणास खूपच संवेदनशील आहेत. म्हणून खरिप हंगामात पावसात खंड पडून पाण्याचा ताण पडल्यास पिकाच्या महत्वाच्या अवस्थेच्या काळात संरक्षित पाणी द्यावे.
4. पाण्याची एकूण गरज ४०-४५(सें. मी.) व पाण्याच्या एकूण ४ पाळ्या


महत्वाच्या अवस्था
मका पिकाच्या महत्वाच्या अवस्थांच्या वेळी पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात लक्षणीय घट येते म्हणून अशा अवस्थांच्या काळात पाणी द्यावे.
1. रोप अवस्था (२५-३० दिवसांनी),
2. पिक वाढीची अवस्था - हा काळ साधारणपणे पीकाचे उगवणीनंतर ३०-४५ दिवसाचा असतो.वाणाच्या गुणधर्मानूसार मक्यास साधारणपणे  १५-२० पाने येतात ही क्रिया झाडावरतूरा येईपर्यंत सुरू राहते.
3. तुरा बाहेर पडताना (४५-५० दिवसांनी) - तूरा वरच्या टोकापासून झुपक्यासारखा येतो. यामधून पुंकेसर बाहेर पडण्याची क्रिया साधारणत: १५ दिवसापर्यंत सुरू राहते.
 4. फुलोऱ्यात असताना (६०-६५ दिवसांनी) - कणसे उमलण्याचा कालावधी:- मक्याचे वरचे टोकापासून तुरा बाहेर पडल्यानंतर २-३ दिवसात झाडाच्या एकूण पानापैकी मधल्या प्रथम पानातुन कणीस बाहेर पडण्यास सुरूवात होते. या कणसातून स्त्रीकेसर बाहेर पडतात व या स्त्रीकेसरावर तु-यामधून निघणारे पुंकेसर पडून त्यांचे संयोगीकरण होते व बीजधारणा होते. कणीस निघण्याचा व संयोगीकरणाचा कालावधी साधारणपणे ५० ते ७० दिवस पर्यतचा असतो.
5. दुधाळ अवस्था :- हा काळ साधारणतः ४ ते ५ आठवड्याचा असतो.

6. दाणे भरणेचेवेळी (७५-८० दिवसांनी). दाणे पक्व होण्याचा काळ :- दुधाळ अवस्थेनंतर दाणे पक्क होण्याकरीता १५ ते २० दिवसलागतात.
रब्बी हंगामात जमिनीच्या मगदुरानुसार १०-१२ दिवसाच्या अंतराने, तर उन्हाळी हंगामात ८-१० दिवसाच्या अंतराने पाणी दयावे.


किड नियंत्रण
1. खोडकिड :
अ) शास्त्रीय नाव : कायलो पार्टेलस

ब) किडीची वैशिष्ठे :
i. अळीच्या पाठीवर काळ्या ठिपक्यांचे पट्टे.
ii. डोक्यावर गडद तपकिरी रंग.
iii. पानावर समान रेषेत छिद्रे.
iv. पोंगा पूर्ण वाळतो.

क) किडीस बळी पडणारी पिकाची अवस्था : रोपावस्था

ड) भौतिक नियंत्रण :
i. वाळलेल्या सुरळ्या अळ्या सहित उपटून जाळून टाकाव्यात.
ii. शेत स्वच्छ ठेवावे.
iii. प्रकाश सापळा वापरावा

इ) रासायनिक नियंत्रण :
i. कार्बारील ८५% डब्ल्यूपी १७६४ ग्रॅम/हेक्टरी ५०० ते १००० लिटर पाण्यातून फवारावे.
ii. किंवा फोरेट १० जी. १० ते १२ किग्रॅ/हेक्टरी प्रमाणे जमिनीत मिसळावे.
iii. किंवा डायामिथोयेट ३० ईसी. १.२ मिली. १ पाण्यातून फवारावे.

ई) जैविक कीड नियंत्रण :
i. ट्रायकोग्रामा चीलोनिस या परोपजीवीचे अंडी असलेले ८ कार्ड प्रती हेक्टरी लावावेत.
ii. निंबोळी अर्क ५% उगवणीनंतर १५ दिवसांनी फवारावे.


2. गुलाबी अळी :
अ) शास्त्रीय नाव : सेसामिया.कहबनु.४च इंफेरंस

ब) किडीची वैशिष्ठे :
i. अळी गुलाबी रंगाची असते.
ii. डोके फिकट तपकिरी रंगाचे.
iii. पानावर लांब निमुळते छिद्र पडते.

क) किडीस बळी पडणारी पिकाची अवस्था : सर्व अवस्था

ड) भौतिक नियंत्रण :
i. पूर्ण वाळलेली सुरळी उपटून नष्ट करावी.
ii. शेत स्वच्छ ठेवावे.
iii. प्रकाश सापळा

इ) जैविक कीड नियंत्रण : ट्रायकोग्रामा चीलोनिस या परोपजीवीचे अंडी असलेले ८ कार्ड प्रती हेक्टरी लावावेत.

3. कणसे पोखरणारी अळी :
अ) शास्त्रीय नाव : हेलीकोव्हरपा आर्मिजेरा
ब) किडीची वैशिष्ठे : सुरवातीला कणसाचे स्त्रीकेसर खाते. त्यानंतर कणसाच्या आत शिरून दाणे खाते.

क) किडीस बळी पडणारी पिकाची अवस्था : केशर अवस्था
i. एक मादी सुमारे ३५० अंडी किंवा त्यापेक्षा जास्त अंडी घालते.
ii. अंड्यातुन ४-५ दिवसात अळ्या बाहेर येतात.
iii. अळीची पुर्ण वाढ कणसामध्ये १५ ते ३५ दिवसात होते.
ई) जैविक कीड नियंत्रण :
i. ट्रायकोग्रामा चीलोनिस या परोपजीवीचे अंडी असलेले ८ कार्ड प्रती हेक्टरी लावावेत.
ii. निंबोळी अर्क ५% उगवणीनंतर १५ दिवसांनी फवारावे.

4. मावा :
अ) शास्त्रीय नाव : ओपोलोसिफम मेडिस
ब) किडीची वैशिष्ठे : लहान माव्याच्या असंख्य किडी पानावर आढळून येतात.पानावर चिकट सतरावा आढळतो.
क) किडीस बळी पडणारी पिकाची अवस्था :
ड) भौतिक नियंत्रण :
इ) रासायनिक नियंत्रण :
ई) जैविक कीड नियंत्रण : क्रायसोपा कार्निया परोपजीवीचे ५००० अंडी प्रती हेक्टरी सोडावेत.


5. अमेरीकन लष्करी अळी :
अ) उगम व प्रसार :
i. अमरीकन लष्करी अळी (Spodoptera frugiperda) ही मूळ अमरिकेतील कीड आहे.
ii. अमरीकेच्या उष्ण व समशितोष्ण कटिबधात ही कीड आढळते.
iii. या किडीची अळी मका, भात, ज्वारी, ऊस, भाजीपाला व कपाशी सारखी 80 पेक्षा जास्त पिकावर प्रादुर्भाव आढळुन येतो.
iv. सन 2016 मध्य या किडीचा अफ्रीका खंडात सर्वप्रथम प्रादुर्भावदिसून आला.
v.जानेवारी 2018 पर्यंत ही कीड सर्व साधारणपणे संपुर्ण आफ्रीका खंडात परसली होती. तसेच नजीकच्या इजिप्त व लिबीया या खंडातही कीड आढळून आली.
vi. सन 2018 मध्य ही किड भारत व श्रीलंकेत आढळून आली आहे.

ब) किडीची ओळख व प्रादुर्भावाची लक्षणे किडीच्या चार अवस्था आहेत :
i. अंडी (2 ते 3 दिवस)
ii. अळी (12 ते 20 दिवस) : (सहा अवस्था)
iii. कोष (12 ते 14 दिवस)
iv. पतंग (14 ते 21 दिवस)

किडीच्या वाढीचा कालावधी हवामान व इतर घटकांवर अवलंबून आहे.

1. पहिली अवस्था : अंडी
i. अंडी (2 ते 3 दिवस)
ii. अंडीसमुहात पानावर किंवा खोडावर सुद्धा घातलीजातात,
iii. परंतू सर्वसाधारणपणे पानाच्या खालच्या बाजुने खोडाजवळ घातली जातात.
iv. त्यावर पतंगाच्या पांढ-या केसांचा थर दिला जातो.

2. दुसरी अवस्था : अळी
i. अळी(12 ते 20 दिवस) - (सहा अवस्था),
ii. पहिल्या अवस्थेतील अळी पानाचा पृष्ठभाग खरवडून खाते. त्यामुळे पानांवर पारदर्शक / पांढरा पॅच दिसतो त्यास विंडो (खिडकी) असे म्हणतात.
iii. प्रथम अवस्थेतील अळी पानाच्या खाली चिकट धाग्याच्या सहाय्याने लोंबकळते व वा-याने  उडून नजीकच्या झाडावर पोहचते.त्यास Ballooning असे म्हणतात.
iv. अळीच्या डोक्यावर उलटा Y आकाराचे चिन्ह दिसते व शेपटाकडील शेवटून दुस-या भागावर काळ ठिपके समान अंतरावर (चौरसासारखे) दिसतात.
v.  उर्वरीत शरिरावरील ठिपके अनुक्रमे दोन जवळ व नंतरचे दोन दुर असे असतात.
vi. अळी कोवळी पाने पोंग्यात शिरून खाते. त्यामुळ पाने कुरतडल्या सारखी दिसतात.अळीची विष्ठा पोंग्यात मोठ्या प्रमाणात दिसून यत. वाळलेली विष्ठा लाकडाच्या भुश्यासारखी दिसते.
vii. पिकाच्या वाढीच्या नंतरच्या कालावधीत अळी कणसाभोवतीची कोवळी पाने खाते व त्यानंतर कोवळे दाणेखाते.

3. तिसरी अवस्था : कोष
i.कोष (12 ते 14 दिवस)
ii. सहाव्या अवस्थेतील अळी त्यानंतर पीकावरून जमीनीवर पडते व जमीनीखाली कोषात जाते.
iii. जमीन घट्ट असेल तर जमीनीवर पीकांचे अवशेष लपेटून तेथेच कोषात जाते.
iv. कणसातील अळी कणसातच कोषात जाऊ शकते.
v. जमीनीतील अळी कोषा भोवती मातीचा थर लपेटून घेते.
vi. कोष सर्वसाधारणपणे 15 मिमी लांबीचा असतो व मातीच्या आवरणासहीत 20 ते 25 मिमी लांबीचा असतो.

4. चौथी अवस्था : पतंग
i. पतंग (14 ते 21 दिवस)
ii. पतंग रात्री सक्रीय असतात व दिवसा लपून बसतात. दिवसा पीकाच्या पानांच्या मध्ये पतंग लपून बसलेले असू शकतात.
iii. पतंग एका रात्रीत 100 किमी पर्यत उडत जाऊ शकतो.
iv. मादी पुंजक्यात अंडी घालते एका पुंजक्यात 100 ते 200 अंडी असू शकतात.
v. मादी पतंग 6 ते 10 पुंजक्यात अंडी घालते.
vi. एक मादी 2 ते 3 आठवड्यात सर्वसाधारणपणे 1500 ते 2000 अंडी घालते.


एकात्मिक किड नियंत्रण

1. पिक पद्धती :
अ) आंतरपीक : किडीला सलग मका पिकावर अंडी घालावयास आवडते. किडीस बळी न पडणा-या आंतरपिकाचा वापर केल्यास उपद्रव टाळता येऊ शकतो.
ब) फेरपालट : एकाच शेतावर सलग हंगामात किडीला बळी पडणारी पिक घेणे टाळावे. मका पिक सलग (खरीप- रबी-उन्हाळी) हंगामात घेणे टाळावे. एकदल व द्विदल पीकाची फेरपालट करावी.

2. मशागत :
अ) खोल नांगरणी
i. कीड जमीनी खाली 2 ते8 सेमी खोल कोषावस्थत जाते.
ii. हा कोष नांगरीने जमीनीवर आल्यास परभक्षी किटक व पक्षी कीडीचे कोष खाऊ टाकतात. त्यामुळे कीड नष्ट होते.
ब) पिकाचे अवशेष नष्ट करणे :
i. ज्या ठिकाणी जमीन घट्ट असेल व कीड जमीनीत शिरू शकत नाही तेव्हा अळी जमीनीवर पिकाचे अवशेष (पान) स्वत:भोवती गुंडाळून कोषावस्थत जाते.
ii.  तसेच कणासातील अळी कणसातच कोषावस्थत जाते. त्यामुळे काढणीनंतर लगेच पिकाचे अवशेष नष्ट करावेत.
3. पेरणी :
अ) पेरणीची वेळ :
i. एकाच क्षेत्रावर वेगवेगळ्या वेळी पेरणी केल्यास कीडीला सलग कोवळी पिक मिळते त्यामुळे उपद्रव वाढतो.
ii. एकाच क्षेत्रावर (गावात) ऐकाच वेळी पेरणी केल्यास कीडीचा उपद्रव कमी होतो.
iii. तसेच उशिराने पेरणी केल्यास कीडीचा उपद्रव जास्त होण्याची शक्यता असते.
iv. त्यामुळे उशिराने पेरणी करू नये तसेच एका गावात शक्यतो एकाच वेळी पेरणी करावी.

ब) बीज प्रक्रीया :
i. उगवणीनंतर लगेच किडींचा प्रादुर्भाव झाल्यास पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते.
ii. हे नुकसान कीडनाशकाची व बुरशीनाशकाची बीजप्रक्रीया केल्यास टाळता येऊ शकते.
iii. त्यामुळे बियाण्यास किटकनाशकाची व बुरशीनाशकाची बिजप्रक्रीया करूनच पेरणी करावी.

4. किडीचे नियंत्रण : किडीचा प्रादुर्भाव वेळेत रोखा व किडीचा प्रसार थांबवा
i. वनस्पतीजन्य कीडनाशके-निंबोळी अर्क
ii. अंडी व अळ्या वेचून नष्ट करा .
iii. पक्षी थांबे : पक्षी कीडीच्या अळ्या व कोष खातात. पक्ष्यासाठी पिकात पक्षी थांबे उभे करा.
iv. परभक्षी कीटक : उदा. Earwigs, Ladybird beetles, Ground beetles, Ants, Birds and bats
v. परोपजीवी कीटक Telenomusremus, Chelonus insularis, Cotesiamarginiventris, Trichogramma (T. pretiosum and T. atopovirilia), Archytas, Winthemia and Lespesia

vi. जैविक कीडनाशक
 • विषाणू (Viruses) : Nuclear Polyhedrosis Virus (NPVs) such as the Spodoptera Frugi perda Multicapsid Nucleopolyhedrovirus (SEMNPV)
 • बुरशी (Fungi) : Metarhizium anisopliae, Metarhiziumrileyi, Beauveriabassiana
 • जिवाणू (Bacteria) : Bacillus thuringiensis (Bt)
 • Nematodes
 • Protozoa

vii .कामगंध सापळा
 • किडीच्या पूर्वसचनेसाठी एकरी एका कामगध सापळ्याचा वापर करा.
 • सापळ्यात अमेरीकन लष्करी अळीसाठीच्या कामगंध ल्युरचाच (गोळी) वापर करा.
 • सापळ्यात अडकलेले पतंग नष्ट करा व सापळा स्वच्छ ठेवा.
 • विहीत कालावधीनंतर सापळ्यातील ल्युर (गोळी) बदला.

 viii. रासायनीक कीडनाशक :
 कीड आर्थीक नुकसान पातळीवर पोहचल्यानंतर शिफारशीनुसार रासायनीक किडनाशकांची फवारणी करावी.

रोग नियंत्रण

1. फुलोऱ्यापूर्वीचा खोड कुजव्या रोग :
अ) कारणीभूत जीव : पिथीयम अफॅनीडरमॅटम | इर्विनिया क्रीसांथेम.
ब) अनुकूल हवामान : अधिक उष्णता व अधिक आद्रता युक्त हवामान.
क) लक्षणे :
i. पिथीयम खोडकुजव्या रोगामध्ये लागण झालेला खोडाचा भाग तपकिरी रंगाचा, आकसलेला, मऊ झाल्याचे दिसून येते.
ii. तसेच जमीन व पहिल्या पेराच्या ठिकाणी पीळ बसून झाड कोलमडते.
iii. याविरुद्ध, जीवाणूजन्य खोडकुजव्या रोगामध्ये रोगाची लागण झाडाच्या कोणत्याही पेरात होऊन त्या ठीकाणचा रंग गडद तपकिरी होतो. तसेच पानाचा देठ व खोडयांवर चिरा दिसून येतात व तद्ननंतर झाड ताबडतोब खाली पडून शेतामध्ये विखुरलेले आढळते.
iv. रोगग्रस्त खोड मधून उभे चिरले असता आतमध्ये रंगहीन तसेच पेराच्या ठिकाणी मऊ झाल्याचे निदर्शनास येईल. तसेच मऊ पडलेल्या उतींमधून दुर्गंधी येते.
v. तसेच रोगग्रस्त झाडाचा शेंडा झाडापासून सहज वेगळा करता येतो.

ड) रोगाची लागण न होणेसाठी घ्यावयाची काळजी : उत्तम निचऱ्याची जमीन मका लागवडीसाठी निवडावी, पेरणी योग्य वेळत करावी व प्रती हेक्टरी झाडांची संख्या योग्य प्रमाणात ठेवावी.
इ) उपाय :
रोगाची लक्षणे दिसून येताच ७५% कॅप्टन १२ ग्रॅम प्रती१००लिटर पाणी प्रमाणात जमिनीतून दिल्यास पिथीयम खोडकुजव्या रोगाचे नियंत्रण करणे शक्य होते.


2. फुलोन्यानंतरचा खोड कुजव्या रोग :
अ) कारणीभूत जीव : फ्युजारियममोनिलीफॉर्म। मॅक्रोफोमिन्काऊजिओलिना

ब) लक्षणे :
i. पिक फुलोऱ्यात येताना या रोगाची लागण होते.
ii. या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मूळ, शेंडा आणि खालील पेरे यांच्यावर होतो.
iii. खोदाचा उभा छेद घेतल्यास आतील भाग गुलाबी-जांभळा किंवा काळ्या रंगाचा झाल्याचे दिसून येईल.

क) रोगाची लागण न होणेसाठी घ्यावयाची काळजी:
i. पिक फुलोऱ्यात असताना पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.
ii. नत्र, स्फुरद व पालाश यांचा शिफारशीत योग्य वापर करावा .
iii. पिकांची फेरपालट करावी.

ड) उपाय :
रोगाची लक्षणे दिसून येताच १० ग्रॅम ट्रायकोडर्मा बुरशी १ किलो शेणखत या प्रमाणात मिसळून मिश्रण १० दिवसांनी सरी-वरंब्या मध्ये टाकावे.


3. टर्सिकम पर्ण करपा :
अ) कारणीभूत जीव : एक्सेरोहिलम टर्सिकम
ब) अनुकूल हवामान : थंड व अधिक आद्रतायुक्त हवामान.

क) लक्षणे :
i. पानांवर लांब अंडाकृती, करड्या-हिरव्या रंगाच्या २.५ ते १५ सेमी. चिरा दिसून येतात
ii. सुरवातीस याचा प्रादुर्भाव झाडाच्या खालील पानांवर दिसून येतो व नंतर वरपर्यंत पसरत जातो.

ड) उपाय : रोगाची लक्षणे दिसून येताच आवश्यकतेनुसार मॅन्कोझेब २.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात ८-१० दिवसांच्या अंतराने फवारावे.

4. मेडिस पर्ण करपा :
अ) कारणीभूत जीव : ड्रेस्क्लेरा मेडिस
ब) अनुकूल हवामान : उष्ण दमट, थंड हवामान.
क) लक्षणे : पानांच्या शिरांमध्ये लांबट तपकिरी किंवा गडद लालसर-तपकिरी रंगाच्या चिरा दिसून येतात.
ड) उपाय: रोगाची लक्षणे दिसून येताच आवश्यकतेनुसार मॅन्कोझेब | झायनेब २.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.

काढणी, मळणी व साठवणूक
i. धान्यासाठी मका पिकाची काढणी कणसावरील आवरण पिवळसर पांढरे आणि दाणे टणक झाल्यावर करावी.
ii. त्यासाठी ताटे न कापता प्रथम कणसे सोलून खुडून घ्यावीत आणि सोललेली कणसे दोन तीन दिवस उन्हात चांगली वाळवावीत.
iii. त्यानंतर कणसातील दाणे काढण्यासाठी मका सोलणी यंत्राचा वापर करावा.
iv.सोलणी यंत्राने दाणे काढल्यानंतर मका दाण्यात ओलाव्याचे प्रमाण १०-१२ टक्के इतके होईपर्यंत उन्हात चांगले वाळवावे म्हणजे साठवणुकीत किडीमुळे नुकसान होत नाही.
v. मका काढणी पीक पूर्ण पक्व होण्यापूर्वी म्हणजे दाण्यात २५-३० टक्के पर्यंत ओलाव्याचे प्रमाण( फिजिओलोजिकल मच्यूरिटी) असताना करता येते.
vi. अशी काढणीची अवस्था पीक पूर्ण पक्व होण्याच्या १०-१५ दिवस अगोदर येते.
vii.अशी काढणी केल्यामुळे उत्पन्नात घट येत नाही मात्र कणसे चांगली वाळवावी लागतात. तसेच अश्या प्रकारच्या काढणीमुळे हिरवी ताटे जनावरांना खाण्यास वापरता येतात.

उत्पादन
सर्वसाधारणपणे संमिश्रवाणांपासून हेक्टरी ५० क्विटल व संकरीत वाणांपासून हेक्टरी ९५- ते १०० क्विटल उत्पादन मिळते.

नवीन प्रॉडक्ट उपलब्ध.  मावा, तुडतुडे किडे, पांढरी माशी, नाकतोडे, मिलिबग, आणि इतर शोषक किडे यांवर रामबाण उपाय संपर्क 9146150117

नवीन प्रॉडक्ट उपलब्ध.  मावा, तुडतुडे किडे, पांढरी माशी, नाकतोडे, मिलिबग, आणि इतर शोषक किडे यांवर रामबाण उपाय संपर्क 9146150117

अद्रक/हळदी पिकातील नियोजन .... सध्या बदललेल्या वातावरणात पिकांवरती *सूडो-बसिलस फवारणी/ ड्रीप आणि                               ट्रायकोडर...

अद्रक/हळदी पिकातील नियोजन....

सध्या बदललेल्या वातावरणात पिकांवरती *सूडो-बसिलस फवारणी/ ड्रीप आणि                         ट्रायकोडरमावापर केला असता बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळते.





*सूडो बसिलस जीवाणू पानांवर 🍃🎞️🎞️ बायोफिल्म म्हणजेच जैविक आवरण 🪬तयार करतात* ज्यामुळे रोगकारक घटकांना रोखण्यास 🚫मदत होते.
🎯चांगल्या आणि जलद परिणामांसाठी शक्यतो
🫠💧💦उत्पादने वापरावीत.
✅ *सुडो-बसिलस रासायनिक बुरशी नाशकांसोबत फवारणी साठी वापरू शकतो.*
#पीक कृषी सेवा केंद्र
9146150117

 


 

  निमॅटोडचा पिकांवरील परिणाम निमॅटोड जमिनीत अंड्यांच्या स्वरुपात सुप्तवस्थेत राहतात . सहसा मादी हि मुळांतुन बाहेर निघत नाही, मुळांवरिल नरम प...

 निमॅटोडचा पिकांवरील परिणाम



निमॅटोड जमिनीत अंड्यांच्या स्वरुपात सुप्तवस्थेत राहतात . सहसा मादी हि मुळांतुन बाहेर निघत नाही, मुळांवरिल नरम पडलेल्या गाठीत ती अंडी देवुन राहते. मात्र नर मुळे सोडुन बाहेर पडतो. ज्यावेळेस वातावरण पोषक असते त्यावेळेस प्रामुख्याने मुळांच्या टोकाद्वारे प्रादुर्भाव होतो.
कधी कधी या गाठी 1 इंच इतक्या जाडीच्या बनतात.
पिकाची वाढ कमी होते वाढ खुंटते,अन्नद्रव्यांची कमतरता दिसु लागते अन्नद्रव्ये पूर्णपणे लागू होत नाहीत.पिक पोषणास अन्नद्रव्ये व पाणी मिळत नाही.
फुले कळी निघण्याचा कालावधी लांबतो, सेटिंग होत नाही, कळी गळ होते. उबदार बागायती परिसरात जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसुन येतो.
1) भाजीपाला वर्गातील पिकांमध्ये -टोमॅटो, वांगी, भेंडी, मिर्ची, वाटाणा, काकडी,
कलिंगड, खरबूज, कारली इ. वेलवर्गीय
2) फळ पिकांमध्ये - :केळी, डाळिंब, पेरू,
3)नगदी पिकांमध्ये -
ऊस,भुईमूग,
4) अन्नधान्य पिकांमध्ये- तांदुळ, गहू, तूर, भुईमूग, इत्यादी पिकांमध्ये सुत्रकृमींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळून येतो.
वापरा आमचा नेमटॉक्स


आधिकं माहितीसाठी संपर्क
9146150117

डाळिंबसाठी आपल्याकडे सर्व प्रकारची सेंद्रिय जीवाणू खते मिळतील डाळिंबसाठी: अपटेक / तेल्या / मुळकुज / सुत्रकृमी संपर्क 9146150117

डाळिंबसाठी आपल्याकडे सर्व प्रकारची सेंद्रिय जीवाणू खते मिळतील



डाळिंबसाठी:
अपटेक / तेल्या / मुळकुज / सुत्रकृमी
संपर्क 9146150117

आद्रक ची साइज् वाढवण्यासाठी वापरा आमचे जैविक सेंद्रिय प्रोडक्ट्स.                                     आधीक माहितीसाठी संपर्क 9146150117 पीक ...



आद्रक ची साइज् वाढवण्यासाठी वापरा आमचे जैविक सेंद्रिय प्रोडक्ट्स.

                                   


आधीक माहितीसाठी संपर्क
9146150117

तूर पिकासाठी आधीपासूनच मूळकूज/ मर रोखण्यासाठी खालील प्रॉडक्ट X 50 ग्राम प्रती लिटर मध्ये मिसळून आळवणी करावी. आधीच रान तयार करतांना जर शेणखत...

तूर पिकासाठी आधीपासूनच मूळकूज/ मर रोखण्यासाठी खालील प्रॉडक्ट X 50 ग्राम प्रती लिटर मध्ये मिसळून आळवणी करावी.



आधीच रान तयार करतांना जर शेणखतामध्ये हे मिसळले तर अती उत्तम.

मिरची मधील मर रोगासाठी वापरा रूट किंग + रूट मॅजिक + आर्मर

माहितीसाठी
पीक कृषी सेवा केंद्र कोल्हापूर
9146150117

                                जमीन उत्तम निचऱ्याची मध्यम काळी, नदी काठची- पोयटा माती अती उत्तम. चुनखडीयुक्त व चोपण जमीन टाळावी. पूर्व मशाग...

                               

जमीन

उत्तम निचऱ्याची मध्यम काळी, नदी काठची- पोयटा माती अती उत्तम. चुनखडीयुक्त व चोपण जमीन टाळावी.

पूर्व मशागत

उभ्या आडव्या २ नांगरटी, कुळवणी करणे, जमीन भुसभुशीत करणे.

सुधारित वाण

फुले स्वरूपा, सेलम, कृष्णा, राजापुरी, टेकूरपेटा.

पेरणी व लागवडीचे

१५ मे ते जून चा पहिला आठवडा. ७५ सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून सरीच्या दोन्ही बाजूस.

अंतर

३७.५ x ३० सें.मी. अंतरावर वरंब्यामध्ये लागण करावी. ठिबक सिंचनासाठी २० ते २५ सें.मी. उंचीचे १२० सें.मी. रुंदीचे गादी वाफे तयार करून ३० x ३० सें.मी.वर लागवड करावी.

बियाणे

गड्डे बियाणे २५ ते ३० क्विंटल प्रति हेक्टरी.

आंतरपिके

हळद + घेवडा, हळद + मुळा, हळद + पालेभाज्या, हळद + मेथी, हळद + मिरची.

खते

लागवडीपूर्वी प्रति हेक्टरी ५० ते ८० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून टाकावे. रासायनिक खतांची मात्रा प्रति हेक्टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व १०० किलो पालाश द्यावी. लागवडीपूर्वी १०० किलो स्फुरद व १०० किलो पालाश द्यावे. नत्राची मात्र दोन समान हफ्त्यामध्ये लागवडीनंतर ६ व १० ते १२ आठवड्याने भरणी करतेवेळी द्यावी.

भरखते

हेक्टरी २ टन निंबोळी किंवा करंजी पेंडीचा वापर भरणीच्या वेळी करावा.

सेंद्रीय हळद

१) जैविक बीज प्रक्रिया :

हेक्टरी ५०० लिटर पाण्यात व्हॅम (VAM) १२.५ किलो + पी.एस.बी. ५ किलो + ॲझोस्पायरिलियम ५ किलो मिसळून द्रावणात १५ मिनिटे कंद बुडवावेत.

२) खतांची मात्रा :

शेणखत १५-२० टन/हे. + लिंबोळी पेंड ४ टन/हे. + गांडुळ खत २ टन/हे.

भरणी करणे

हळदीचे कंद उघडे राहू नयेत यासाठी लागवडीनंतर १० ते १२ आठवड्यांनी मातीने भरणी करावी. भरणी करताना शिफारस केलेल्या खतांच्या मात्रा द्याव्यात.

तणनियंत्रण

हळद लागवडीनंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी जमिन ओलसर असताना अॅट्राझीन उगवणपूर्व तणनाशक ५० ग्रॅम १० लिटर पाण्यात घेऊन फवारावे. हळद उगवणीनंतर कोणतेही तणनाशक फवारू नये. तणांच्या तिव्रतेनुसार २ ते ३ वेळा खुरपणी करावी.

पाणी व्यवस्थापन

लागवडीनंतर ५ ते ७ दिवसाच्या अंतराने, पावसाळ्यात पाऊस नसल्यास १० ते १२ दिवसाच्या अंतराने तर हिवाळ्यात १२ ते १५ दिवसाच्या अंतराने जमिनीच्या प्रतिनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

पिकाचा कालावधी

७ ते ९ महिने

काढणी

पिकाची काढणी जातीपरत्वे पिकाचा कालावधी पुर्ण झाल्यावर करावी. काढणीपूर्वी जमिनीच्या प्रतिनुसार १५ ते २० दिवस पाणी देणे बंद करावे. सरीवरंबा पध्दतीवर कुदळीने खोदन काढणी करावी तर गादीवाफे पध्दतीवर मशिनच्या सहाय्याने काढणी करावी.

उत्पादन

सुधारित तंत्रानुसार लागवड केल्यास ओल्या हळदीचे हेक्टरी २५० ते ३५० क्विंटल तर वाळलेल्या हळदीचे ६० ते ७५ क्विंटल उत्पादन मिळते. गादी वाफ्यावर लागवड केल्यास हळद काढणी यंत्राव्दारे काढणी करता येते त्यामुळे मजुरीत बचत होते.

प्रक्रिया

हळदीच्या जास्त उताऱ्यासाठी आणि कुरकुमीन टिकविण्याकरीता २०० किलो क्षमतेच्या कुकर यंत्रामध्ये १५ मिनीटात हळद वाफेवर ( १.२ कि/सें.मी') शिजवावी.

पिक संरक्षण

कंदमाशी

अळ्या उघड्या गड्ड्यामध्ये शिरून कंदावर उपजिविका करतात. अशा गड्ड्यामध्ये नंतर रोगकारक बुरशी तसेच सूत्रकृमिंची शिरकाव होतो. त्यामुळे खोड व गड्डे मऊ होतात व त्यांना पाणी सुटून ते कुजतात.

नियंत्रण

क्विनालफॉस २५ % प्रवाही २० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून जुलै ते ऑगस्ट दरम्यान १५ दिवसांच्या अंतराने १ ते २ फवारण्या कराव्यात. वेळेवर भरणी करावी. हेक्टरी ६ नग माती अथवा प्लॅस्टिकची पसरट भांडी वापरून प्रत्येक भांड्यात भरडलेले एरंडीची बी २०० ग्रॅम + १.५ लिटर पाणी घ्यावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणातून वास बाहेर निघू लागल्यावर कंदमाशी आकर्षित होऊन मरू लागतात. सदरची उपाय योजना अत्यंत प्रभावी, कमी खर्चीक व सहजरित्या करता येण्यासारखी असल्याने सेंद्रिय हळद उत्पादनामध्ये महत्वाची भुमिका निभावणारी ठरु शकते तसेच अळ्यांकडून कंदांचे नुकसान करण्या अगोदरच कंदमाश्या मरत असल्याने विशेष प्रभावी आहे.


पानांवरील ठिपके (करपा)

पानांवर लंब गोलाकार तपकिरी रंगाचे अंडाकृती ठिपके पडतात. रोगट भाग वाळून तांबूस तपकिरी रंगाचा दिसतो.

नियंत्रण

नियंत्रण लागवडीसाठी रोगमुक्त बियाणे वापरावे. कार्बेन्डॅझिम १० ग्रॅम १० लिटर पाण्यात फवारावे.

कंदकुज

सुरळीतील पानांचे शेंडे व कडा पिवळे पडून १ ते १.५ से.मी. खालीपर्यंत वाळत जातात आणि पुढे पान संपुर्णपणे वाळले जाते. खोडाचा जमिनीलगतचा बुंधा व गड्डा काळपट, राखाडी पडतो. गड्डयावर दाब दिला असता त्यातून कुजलेले, घाण वास येणारे पाणी बाहेर येते.

नियंत्रण

लागवडीसाठी रोगमुक्त बियाणे वापरावे, उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी. शेतात पाणी साचू देऊ नये. वेळेवर भरणी करावी. कंदवर्गिय पिकांवर पुन्हा कंदवर्गीय पिक घेऊ नये. कार्बेन्डझिम ५० डब्ल्यु.पी. १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात घेऊन फवारावे. पीक लागवडीच्या वेळी ट्रायकोडर्मा प्लस ५ किलोग्रॅम प्रति हेक्टरी शेणखतातून मिसळून द्यावे.

  हळद प्रस्‍तावना हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र १,२५,८०० हेक्टर असून उत्पादन ५...

 

हळद

प्रस्‍तावना

हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र १,२५,८०० हेक्टर असून उत्पादन ५,५०,१८५ मे. टन इतके आहे. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ ८०% उत्पादन भारतामध्ये होते, परंतु त्यापैकी १५ ते २० % फक्त हळद निर्यात होते. उत्पादनाचा विचार केला असता प्रथम क्रमांक आंध्रप्रदेश असून त्यानंतर ओरिसा, तामिळनाडू आसाम, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो. महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली ८,५०० हेक्टर क्षेत्र असून उत्पादन ४२,५०० मेट्रिक टन इतके होते. भौगोलिक दृष्ट्या हळद लागवडीस भारतात अनुकूल वातावरण असल्यामुळे जम्मू काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत हळदीची लागवड होऊ शकते. महाराष्ट्रातील वातावरण हळद लागवडीस अतिशय अनुकूल असल्यामुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्यास महाराष्ट्रात वाव आहे. त्यासाठी महत्त्वाच्या बाबींमध्ये सातत्याने विचार होणे गरजेचे आहे. त्यामध्ये सतत होणार्‍या हळदीच्या दरामधील चढउतार, उन्नत जातीच्या लागवडीखालील अपुरे क्षेत्र, सेंद्रिय खतांची कमतरता, मोठ्या प्रमाणात करावा लागणारा मशागत खर्च, नियंत्रित बाजारपेठेचा अभाव, यांत्रिक पद्धतीने काढणी करणे इत्यादी बाबींचा विचार करून जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचे प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या रोजच्या आहारातील हळदीला अनन्य साधारण महत्त्व आहे. १०० ग्रॅम हळदीमध्ये खालील घटक आढळतात.



पाणी६ ग्रॅमसोडिअम१० मिली ग्रॅम
ऊर्जा३९० कॅलरीलोह४७.५ मिली ग्रॅम
प्रथिने८.५ ग्रॅमअ जीवनसत्व१७५ आय. यु.
स्निग्ध पदार्थ८.९ ग्रॅमब जीवनसत्व०.०९ मिली ग्रॅम
कर्बोदके६९.९ ग्रॅमब - २ जीवनसत्व०.१९ मिली ग्रॅम
तंतू६.९ ग्रॅमनिआसीन४.८ मिली ग्रॅम
राख६.८ ग्रॅमअॅस्कॉरबीक अॅसिड५० मिली ग्रॅम
कॅल्शिअम०.२ ग्रॅमकुरकुमीन२ ते ६ %
फॉस्फरस२८० मिली ग्रॅमसुगंधी तेल५ % पर्यंत
पोटॅशिअम२५०० मिली ग्रॅम  

हळदीचे औषधी गुणधर्म

  • 1. आयुर्वेद शास्त्रानुसार हळद पोटदुखी निवारक, रक्तशुद्धीकारक, बलवर्धक, कृमीनाशक आम्लपित्तहारक, भूक उद्दीपीत करणारी आहे.
  • 2. हळदीमुळे त्वचेचा रंग उजळतो तसेच ती रक्तशुद्धीसाठी गुणकारी आहे.
  • 3. पायावर सूज आल्यास हळद, गुळ व गोमुत्र गरम करून प्यावे.
  • 4. डोळ्याचे विकारावर हळकुंड तुरीच्या डाळीत शिजवून डोळ्यात अंजन करावे.
  • 5. डाळीच्या पिठामध्ये थोडी हळद, थोडा पिसलेला कापूर व ४ ते ५ थेंब मोहरीचे तेल टाकून स्नान केल्यास त्वचारोग, खाज थांबून पूर्ण अंगकांती सुधारते.

महत्त्व

धार्मिक कार्यक्रमात तसेच हळदीपासूनचे कुंकू, हळद, लग्नकार्य, पूजा, भंडारा, सौंदर्य प्रसाधने व अनेक पोषक घटक तयार करतात.

हवामान

हळद पिकास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. मध्यम पाऊस व चांगल्या स्वच्छ प्रकाशात या पिकाची वाढ उत्तम होते. पाण्याचा ताण व जास्त पाऊससमान हे पीक काही वेळ सहज सहन करू शकते, परंतु जास्त दिवस पिकात पाणी साचून राहणे हानिकारक आहे. तसेच कडक हिवाळा या पिकास मानवत नाही. सरासरी ५०० ते ७५० मिलीमीटर असणार्‍या निमशुष्क वातावरणात हळदीचे पीक चांगले येते.थंडीमुळे हळदीची पानेवाढ काही अंशी थांबते व जमिनीतील कंदांची (फण्यांची) वाढ होते. कोरडे व थंड हवामान कंद पोषणास अनुकूल असते.

जमीन

हळद पिकाची यशस्वी किंबहुना फायदेशीर लागवड ही प्रामुख्याने जमिनीच्या निवडीवरच अवलंबून असते. हे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येत असले तरीसुद्धा त्या जमिनीचे भौतिक, रासायनिक तसेच जैविक गुणधर्म, जमिनीची जडण - घडण, जमिनीचा सामू, जमिनीचा उतार या गोष्टी लागवडीपूर्वी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपणाकडे उपलब्ध असणार्‍या जमिनीचा प्रकार, तिचे विविध गुणधर्म, त्या जमिनीचा पोत याचा अभ्यास करूनच हळद लागवड करावयाची की नाही हे ठरवावे लागते. या पिकास मध्यम प्रतीची तसेच चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते. भारी काळ्या चिकन, क्षारयुक्त जमिनीत हळदीचे पीक चांगले येत नाही म्हणून हळद लागवडीसाठी शक्यतो अशा जमिनीची निवड करू नये. चांगल्या उत्पादनासाठी मध्यम, काळी, पोयट्याची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी. आपल्याकडे हलक्या व माळरानांच्या जमिनीत सुध्दा हळदीचे पीक घेता येईल. मात्र सरासरी उत्पादन मिळविण्यासाठी त्या जमिनीची सुपिकता वाढवणे, पोत सुधारणे, सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे आणि जमिनीची चांगली मशागत करणे इ. गोष्टी केल्यास माळरानावर सुध्दा हे पीक फायद्याचे ठरू शकते. शक्यतो चुनखडीयुक्त जमिनीमध्ये हळद पीक घेणे टाळावे. अशा जमिनीत पिकावर सतत पिवळसरपणा दिसून येतो व पिकाची वाढ चांगली होत नाही.

सुधारित जाती

१) फुले स्वरूप : ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केली असून सदर जात ही मध्यम उंच वाढणारी अशी आहे. सरळ वाढीची सवय असून पानांचा रंग हिरवा असून क्रियाशील पानांची संख्या ६ ते ७ असते. या जातीचा पक्क्तेचा काळ हा ८.५ महिन्याचा असून फुटव्यांची संख्या २ ते ३ प्रति झाड असते. या जातीचे जेठे गड्डे मध्यम आकाराचे असून वजनाचे ५० ते ५५ ग्रॅम असतात. हळकुंडे ३५ ते ४० ग्रॅम वजनाची असून प्रत्येक कंदात ७ ते ८ हळकुंडे असतात. त्यांनंतर त्यावर उपहळकुंडाची वाढ होत असते. मुख्य हळकुंडाची लांबी ७ ते ८ सें.मी. असते. बियाणे व उत्पादनाचे प्रमाण १:५ असे आहे. हळकुंडे सरळ लांब वाढतात. हळकुंडाच्या गाभ्याचा रंग गर्द पिवळसर असा आहे. या जातीमध्ये पिवळेपणाचे प्रमाण सध्या प्रसारीत असलेल्या जातीपेक्षा जास्त म्हणजे ५.१९% इतके असून उतार २२% इतका मिळतो. या जातीने सरासरी ओल्या हळदीचे उत्पादन ३५८.३० क्विं./हे. दिल्याचे दिसून आले असून वाळलेल्या हळदीचे उत्पादन ७८.८२ क्विं./हे. हिल्याची नोंद आहे. या जातींमध्ये पानावरील करपा रोगास तसेच कंदमाशी या किडीस प्रतिकारक गुण असल्याचे दिसून आले आहे.

२) सेलम : या जातींची पाने रुंद हिरवी असतात. पिकाच्या एकूण वाढीच्या कालावधीमध्ये १२ ते १५ पाने येतात. झाडास सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये १२ ते १५ पाने येतात. हळकुंडे व उपहळकुंडे जाड व ठसठशीत असतात. हळकुंडाची साल पातळ असून गाभ्याचा रंग केशरी पिवळसर असतो. हळकुंडावरील पेर्‍यांची संख्या ८ ते ९ असते. कच्च्या हळदीचे उत्पादन ३५० ते ४०० क्विंटल प्रती हेक्टरी मिळते. या जातीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण ४.५ टक्के असते. वाळलेल्या हळदीचे ७० ते ७५ क्विंटल प्रती हेक्टरी उत्पादन मिळते. ही जात पक्क होण्यास ८.५ ते ९ महिने लागतात. चांगल्या कसदार पोताच्या जमिनीत या जातीच्या झाडांची उंची जवळजवळ ५ फुटांपर्यंत वाढते आणि ३ ते ४ फुटवे येतात. सध्या महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यामध्ये लागवड करण्यास महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर यांनी या जातीची शिफारस केली आहे.

३) कृष्णा (कडाप्पा ) : या जातीची हळकुंडे लांब, जाड व प्रमाणबद्ध असतात. हळकुंडाचा गाभा पांढरट पिवळा असतो. दोन पर्‍यामधील अंतर इतर जातीच्या तुलनेने जास्त असते. पेर्‍यांची संख्या ८ ते ९ असून झासांची पाने रुंद आणि सपाट असतात. एकून पिकाच्या कालावधीमध्ये १० ते १२ पाने येतात. पानावरील ठिपके (लिफ ब्लॉच) या रोगास ही जात अल्प प्रमाणत बळी पडते. वाळलेली हळकुंडे थोडीशी सुकलेली दिसतात. वाळल्यानंतर मुख्य हळकुंडाची लांबी जवळ जवळ ६ ते ७ सें.मी. असते.

या जातीच्या वाळलेल्या हळदीचे उत्पादन ७५ ते ८० क्विंटल प्रती हेक्टरी येते. ही जात हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज येथून सन १९८४ साली कडाप्पा जातीमधून निवड पद्धतीने काढण्यात येऊन शेतकर्‍यांना लागवडीसाठी प्रसारित केली आहे.

४) राजापुरी : या जातीची पाने रुंद, फिकट हिरवी व सपाट असतात. पिकाच्या वाढीच्या एकूण कालावधीमध्ये १० ते १८ पाने येतात. झाडास फुले क्वचित येतात. हळकुंडे व उपहळकुंडे आखूड व जाड ठसठशीत असतात. हळकुंडाची साल पातळ असून गड्ड्यांचा रंग पिवळा ते गर्द पिवळा असतो. शिजवल्यानंतर वाळलेल्या हळदीचा उतारा १८ ते २० टक्के पडतो व प्रती हेक्टरी कच्च्या हळदीचे उत्पादन ५५ ते ५८ क्विंटल मिळते. ही जात करपा रोगास बळी पडते. पक्क होण्यास ८ ते ९ महिने लागतात. या जातीला स्थानिक बाजारपेठेत तसेच गुजरात व राजस्थान राज्यांतून चांगली मागणी असल्याने भावही चांगला मिळतो. बर्‍याच वेळा हळदीच्या वायदे बाजारातील भाव या जातीवरून ठरला जातो. महणून ही जात कमी उत्पादन देणारी असली, तरी लागवडीसाठी प्राधान्याने शेतकरी या जातीला पसंती देतात.

५) खाण्याची हळद (Curcuma Longa ) : ही बहुवर्षीय जात असून ६० ते ९० सें.मी. उंच वाढते. पानांना खमंग वास असून फळे तीनधारी असतात. बोंड, कंद आखूड व जाड असतो. पातळ पाने ६० ते ९० सें.मी. लांब असून कंदापासून ६ ते १० पोपटी हिरव्या रंगाची पाने वाढतात. फुले पिवळसर पांढरी असतात, मात्र लागवडीच्या पिकात फळे धरत नाहीत, कारण ती नपुंसक असतात. या जातीची ९६% लागवड भारतात होते.

६) कस्तुरी किंवा रानहळद ( Cucuma Caesia) : ही जात वार्षिक असून महाबळेश्वर, कोकण विभाग आणि आंध्रप्रदेशात मोठ्या प्रमाणात लागवड करतात. कंद मोठे गोलाकार, फिकट पिवळे (आत नारिंगी लाल) असून कापराचा वास असतो. प्रक्रियेनंतरच्या (हळकुंडास) गोड वास असतो. ६.१% हिरवट तपकिरी तेल, कापराचा वास असल्याने औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
पाने लांब - वर्तुळाकर व आल्यासारखी टोकदार, मध्यशीरा उठावदार असतात, फुले सुवासिक, औषधासाठी उपयोग.

७) इस्ट इंडियन अॅरोरूट (East Indian Aroroot) : मध्यभारत, बंगाल, महाराष्ट्रा, तामिळनाडुच्या डोंगराळ भागात व हिमालयात या जातीची लागवड आढळते. कंदातील स्टार्च १२.५ % असून त्याचा उपयोग खर्‍या अॅरोरूटला पर्याय म्हणून तसेच मुलांना व आजारी माणसांना मिल्क पुडिंग करून देतात.

८) आंबेहळद (Curcuma Amada) : कोवळ्या कंदाला कच्च्या आंब्याचा वास असल्याने त्याला आंबे हळद म्हणतात. कोकण, बंगाल, तामिळनाडू व पश्चिम घाटातील भागात प्रामुख्याने लागवड केली जाते. कंद बारीक व आतील गार पांढरा असून कंदाचे लोणचे करतात. बहुवर्षायु जात असून पाने लांब वर्तुळाकार, आल्यासारखी व पानांचा जुडगा खालपासून वाढतो. मधली शीर उठावदार असते. फुले हिरवट - पांढरी असून बोंड तीनधारी असते.
औषधी उपयोग : कातडी मऊ होण्यासाठी अंगाला चोळतात. मुरगळल्यावर व सुजेवर उगाळून लावतात. चामडीची खाज घालविते. थंड, पाचक व रक्तशुद्धीकरता, जंतुनाशक म्हणून उपयुक्त आहे.

९) काळी हळद (Curcuma Caesia) : बंगालमध्ये आढळते. ताजे कंद फिकट पिवळे, सुवासिक, सौंदर्यप्रसाधनात वापरतात. कंदामध्ये ९.७६% सुवासिक तेल असते.

१०) कचोर (Curcuma Zedoria) : वार्षिक जात असून कोकणात सर्वत या जातींची लागवड आढळते. औषधाकरिता ताजे मूळ व गड्डे रक्त शुद्धीकरणासाठी वापरतात. पानांचा रस महारोगांवर उपयुक्त ठरतो.

पूर्व मशागत

हळद लागवडीमध्ये पूर्वमशागतीच्या कामामाध्ये नांगरट करणे, ढेकळे फोडणे, शेताच्या कडा कुदळीने किंवा टिकावाणे खणून ही सर्व कामे पूर्वनियोजन करून त्याप्रमाणे करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जमिनीची ट्रॅक्टर ने १८ ते २२ सें.मी. पर्यंत खोल नांगरट करून घ्यावी. पहिल्या नंगारटीनंतर शेतात नंगारटीमधून चुकलेल्या कडा १ फुटांपर्यंत टिकावाने खणून घ्याव्यात. त्याचवेळी जमिनीमधील कुंदा, लव्हाळ्याच्या गाठी यासारख्या बहुवर्षीय तणांचे अवशेष मुळांसह काढून जाळून नष्ट करावेत.

पहिल्या नंगारटीनंतर शेतात मोठी ढेकळे दिसत असल्यास तव्याचा कुळव मारून घ्यावा. त्यानंतर १५ ते २० दिवसांनी परत संपूर्ण ढेकळे फोडून घ्यावीत आणि ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून घ्यावे.

हळद लागवडीच्या पद्धती

१) सरी वरंबा पध्दत

हळदीचे कंद जमिनीत वाढत असल्याने या पिकाची लागवड सरी वरंबा किंवा रुंद वरंबा पद्धतीने लागावाद करावयाची झाल्यास ७५ ते ९० सें.मी. अंतरावर सर्‍या पाडून घ्याव्यात. शक्य असेल तर सरी पाडण्यापूर्वी शिफारस केलेले स्फुरद आणि पालाश जमिनीत टाकून द्यावे. जमीनच्या उताराप्रमाणे ६ ते ७ सरी वरंब्याचे एक वाकुरे याप्रमाणे वाकुरी बांधून घ्यावीत. वाकुर्‍याची लांबी जमिनीच्या उतारानुसार पाणी बसेल अशी ठेवावी. सोयीप्रमाणे पाणी व्यवस्थित बसण्यासाठी पाण्याचे पाट सोडावेत.

२) रुंद वरंबा पध्दत

रुंद वरंबा पद्धतीने रान बांधणी करून काही ठिकाणी अधिक उत्पादन घेतले जाते. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसून उत्पादनात २० ते २५ % वाढ झाल्याचे आढळून आले आहे. या पद्धतीने जमिनीस पाणी देण्यास जास्त त्रास होतो म्हणून अशा पद्धतीने लागण करावयाची असल्यास जमीन समपातळीत असणे आवश्यक आहे किंवा पाणी देण्याच्या सुधारित तंत्रज्ञानामधील ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे. रुंद वरंबा तयार करताना १५० सें.मी. अंतरावर प्रथम सर्‍या पाडाव्यात. त्या सर्‍या उजरून ८० ते ९० सें.मी. माथा असलेले १५ सें.मी. उंचीचे व उताराचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी व्यवस्थित बसेल अशा लांबी रूंदीचे सरी वरंबे पाडावेत. वरंब्याचा माथा सपाट करून घ्यावा आणि मग लागवड करून घ्यावी.

लागवडीचा हंगाम आणि लागवड

हळदीची लागवड साधारणपणे एप्रिल महिन्याच्या मध्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. ठिकठिकाणच्या स्थानिक प्राप्त परिस्थितीनुसार लागवडीचा कालावधी मागेपुढे होतो. लागवडीसाठी वापरले जाणार्‍या बियाणांची सुप्तावस्थ संपलेली असावी. बियाणाचे डोळे नकळत फुगलेले असावेत. कुजलेले, अर्धवट सडलेले बियाणे लागवडीसाठी वापरू नये. लागवडीसाठी हळकुंड बियाणे वापरले तरी चालतात. मात्र हळकुंड बियाणे ३० ग्रॅमपेक्षा वजनाने मोठे असावेत. सरी वरंबा पद्धतीने लागवड करावयाची झाल्यास वरंब्याच्या दोन्ही बाजूस ३० सें.मी. अंतरावरती गड्डे कुदळीने अगर्‍या घेऊन लावावेत किंवा वाकुरी पाण्याने भरल्यानंतर गड्डे पाण्यामध्ये वरंब्यात ३ ते ५ सें.मी. खोल दाबून घ्यावेत. रुंद वरंबा पद्धतीने ३० x ३० सें.मी. अंतरावरती गड्डे लावून घ्यावेत. लागवडीच्या वेळी गड्डे पुर्ण झाकले जातील याची दक्षता घ्यावी.

बेणे

एकरी १००० किलो बेणे लागते. लागवड मातृकंदापासून करतात. या कंदापासून तयार केलेल्या ३० दिवसाच्या वयाच्या रोपापासूनही लागवड करतात. कन्याकंदही लागवडीसाठी वापरतात.

बीजप्रक्रिया

१ लि. जर्मिनेटर १०० लि. पाण्यामध्ये घेऊन त्यामध्ये १०० किलो बेणे १० मिनिटे भिजवून नंतर ते सुकवून लावावे. हे द्रावण २ ते ३ वेळा वापरता येते. त्यामुळे कंद (बेणे) लवकर, एकसारखे उगवून मर होत नाही.

आंतरमशागत (भरणी करणे)

हळदीच्या लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी भरणी करणे अत्यंत आवश्यक आहे. सरीमधील माती किंवा लागण केलेल्या दोन्ही गड्ड्यांच्यामधील मोकळ्या जागेमधील माती १.५ ते २ इंच शिपीच्या कुदळीने खणून दोन्ही बाजूंच्या गड्ड्यांना लावणे म्हणजे 'भरणी करणे' होय. माती लावताना संपूर्ण कंद झाकला जाईल अशा पद्धतीने माती लावावी. भरणी केल्यानंतर पिकास हलकेसे पाणी द्यावे. भरणी केल्यामुळे नवीन येणारे हळकुंड झाकले जातात व त्यांची चांगली वाढ होते. मात्र याउलट भरणी न केल्यास जमिनीच्या बाहेर आलेल्या हळकुंडाची वाढ होत नाही. थोडीफार झाली तरी ती निकृष्ट दर्जाची होते आणि उत्पादनामध्ये जवळजवळ १० ते १५ टक्क्यांनी घट येते.

पाणी व्यवस्थापन

हळदीची लागवड एप्रिल -मे महिन्यामध्ये होत असल्याने सुरुवातीच्या काळात पावसाची सुरुवात होईपर्यंत पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. कारण दरम्यानच्या काळात मुळांकडून स्थिरता प्राप्त होणे हा महत्त्वाचा कालावधी असतो, म्हणून लागवडीनंतर आंबवणीचे पाणी लगेच ४ ते ६ दिवसांच्या अंतराने द्यावे. जमिनीच्या प्रतिनुसार हा कालावधी कमी -जास्त ठेवावा. पावसाला सुरू झाल्यानंतर पावसाचेह पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यानंतर हिवाळयामध्ये पाण्याच्या २ पाळीमधील अंतर १२ ते १५ दिवस ठेवावे. मात्र पीक काढणीच्या १५ दिवस अगोदर अजिबात पाणी देऊ नये.

खते

हळद पिकासाठी खतामधील सर्व घटकांची कमी- अधिक प्रमाणात गरज असते. मात्र हळद पिकासाठी रासायानिक खते वापरलेल्या हळदीच्या कंदावरती अनिष्ट परिणाम होतो. असा अनुभव शेतकर्‍यांचा आहे. तेव्हा हळदीला शक्य तेवढ्या प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करावा. यामध्ये पुर्ण कुजलेले शेणखत एकरी १० टन (२० बैलगाड्या) आणि कल्पतरू सेंद्रिय खत ७५ ते १०० एकरी किलो दिन हप्त्यातून (लागवडीवेळी अर्धी मात्र आणि भरणीच्यावेळी अर्धी मात्रा याप्रमाणे) द्यावे. त्याचवेळी हेक्टरी २०० ते ३०० किलो करंजी किंवा निंबोळी पेंड द्यावी आणि भरणी करून द्यावी. या पिकास भरणीनंतर कोणतीही खते देऊ नयेत.

आंतरपिकांची लागवड

मुख्य पिकाशी स्पर्धा न करता हळद पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ करणार्‍या आंतरपिकांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही पिके हळद पिकापेक्षा उंचीने कमी तसे च पसार्‍याने कमी जागा व्यापणारी असावीत. हळद पिकाची लागवड केल्यापासून ३ ते ३.५ महिन्यांनी फुटवे येउन कंद पोसण्यास सुरुवात होते. त्यासाठी हळकुंड येण्याच्या कालावधीपूर्वी आंतरपिकाची काढणी होणे फायदेशीर ठरते, महणून हळद पिकामध्ये श्रावणघेवडा, मिरची, कोथिंबीर या पिकांची लागवड करावी. मका हे पीक हळदीमध्ये घेऊ नये. कारण मक्यामुळे हळदीच्या उत्पादनामध्ये १५ ते २० % घट येते.

कीड नियंत्रण

१) कंदमाशी : या पिकास कंदमाशीसारख्या किडीचा मोठा उपद्रव होतो. या किडीची माशी डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असते. माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून त्यावर राखी रंगाचे ठिपके असतात. अंडी पांढरट रंगाची असतात. अळी पिवळसर असून त्यांना पाय नसतात. या किडीच्या अळ्या उघड्या गड्ड्यामध्ये शिरून त्याच्यावर उपजीविका करतात. याच्या नियंत्रणासाठी कंदमाशा शेतामध्ये दिसू लागताच माशा मारण्यासाठी प्रोटेक्टंट ३० ग्रॅम आणि क्विनॉलफॉस २५% प्रवाही २० मी.ली. १० लिटर पाण्यामध्ये मिसळून जुलै ते ऑगस्ट दरम्यान १ ते २ फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात. याच किटकनाशकाचे पुढील २ हप्ते १ महिन्याच्या अंतराने ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये द्यावेत. अर्धवट कुजले, सडके बियाणे लागवडीस वापरू नये. जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये शेतात उघडे पडलेले गड्डे मातीने झाकून घ्यावेत.

२) पानातील रस शोषून घेणारा ढेकूण : या किडीची पिल्ले पानाच्या पाठीमागे एकत्रितपणे आढळून येतात. ते पानाच्या पाठीमागे राहून पानातील रस शोषून घेतात. या किडींचा उपद्रव झालेली पाने तांबूस पिवळसर रंगाची दिसून येतात. तिच्या नियंत्रणासाठी प्रोटेक्टंट २५ ग्रॅम + मोनोक्रोटोफॉस ३६ डब्ल्यू. एस. सी. १० मिली १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

३) पाने गुंडाळणारी अळी : हळद पिकावर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीची अळी हिरवट रंगाची असून ती अंड्यातून बाहेर पडल्यानंतर स्वत:च्या शरीराभोवती पान गुंडाळून घेते व आत राहून पाने खाते. किडीचा प्रादुर्भाव दिसताच गुंडाळलेली पाने गोळा करून नष्ट करावीत. तसेच कार्बारील ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी.

४) सुत्रकृमी : काही भागामध्ये या पिकावर सुत्रकृमींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. पिकाच्या मुळाभोवती राहून सुईसारख्या अवयवाने मुळातील रस शोषण करतात. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते व पाने पिवळी पडतात. तसेच यांनी केलेल्या छिद्रातून कंदकुजीस कारणीभूत असलेल्या बुरशींचा सहज शिरकाव होतो. सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी लागवडीच्या वेळी ट्रायकोडर्मा प्लस ५ किलो /हे. शेणखतात मिसळून द्यावा किंवा फोरेट १० जी. हेक्टरी २५ किलो याप्रमाणात द्यावे किंवा १८ ते क्विं/हे. लिंबोळी पेंडीचा वापर करावा.

रोग नियंत्रण

१) कंदकूज (गड्डे कुजव्या) : हळद तसेच कंद वर्गातील पिकांवरील हा एक प्रमुख रोग आहे. वेळीच खबरदारी न घेतल्यास या रोगामुळे ५०% पर्यंत नुकसान होऊ शकते. भरपूर पाऊस, भारी काळी कसदार, कमी निचरा असणारी जमीन या रोगास पोषक ठरते. हा रोग ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. प्रथम पानांचे शेंडे वरून व कडांनी पिवळे पडून खालीपर्यंत वाळले जातात. खोडाचा जमिनीलगतचा भाग काळपट राखी पडतो. याच ठिकाणी माती बाजूस करून पाहिल्यास गड्डाही वरून काळा पडलेला व निस्तेज झालेला दिसतो. या भागावर दाब दिल्यास त्यातून कुजलेले, घाण वास येणारे पाणी बाहेर येते. अशा झाडाचे खोड थोडे जरी ओढले तरी चटकन हातात येते. हा रोग प्रामुख्याने सुत्रकृमी किंवा खुरपणी करताना/आंतरमशागत करताना कंदास ईजा झाल्यास त्यातून पिथियम, फ्युजेरियम यासारख्या बुरशींचा गड्ड्यामध्ये शिरकाव होऊन कंदकुजण्यास सुरुवात होते.

या रोगाच्या नियंत्रणासाठी लागवड करतान निरोगी बियाण्याचा वापर करावा. जमीन हलकी ते मध्यम परंतु उत्तम निचर्‍याची निवडावी. पावसाळ्यात शेतामध्ये चर घेऊन पाण्याचा निचरा करून घ्यावा. तसेच मेटॅलॅक्सिल ८% + मॅकोझेब ६४% हे संयुक्त बुरशीनाशक २.५ ग्रॅम प्रति लिटर किंवा कार्बेंडॅझिम (५० डब्ल्यू. पी.) १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात किंवा मॅकोझेब २.५ गरम प्रति लिटर यापैकी एका बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. शेतामध्ये हा रोग आढळून आल्यास याच बुरशीनाशाकांची आलटून पालटून फवारणी करावी. लागवडीच्या वेळी ट्रायकोडर्मा प्लस पाच किलो प्रति हेक्टरी शेणखतातून मिसळून द्यावा.

२) पानावरील ठिपके (लिफ ब्लॉच) : या रोगामध्ये पानावरती लंबगोलाकार तपकिरी रंगाचे अंडाकृती ठिपके दिसतात. ते सूर्याकडे धरून पाहिल्यास त्यात अनेक वर्तुळे दिसतात. रोगट भाग पूर्णत: वाळतो व तांबूस राखी रंगाचा दिसतो. असे ठिपके वाढून एकत्रित येतात आणि संपूर्ण पान करपते. या रोगाची तीव्रता सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये दिसून येते. हा रोग कोलेटोट्रिकम कॅपसिकी या बुरशीमुळे होतो. यांच्या नियंत्रणासाठी थ्राईवर ३० मिली + क्रॉंपशाईनर ३० मिली आणि हार्मोनी १५ ते २० मिली १० लिटर पाण्यात किंवा १ टक्का बोर्डोमिश्रण तयार करून फवारणी करावी. हवामानाच्या परिस्थितीनुसार सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये १५ ते २० दिवसाच्या अंतराने फवारण्य कराव्यात.

३) पानावरील ठिपके (टिक्का) : हा बुरशीजन्य रोग असून टॉंफ्रिन मॅक्यूलन्स नावाच्या बुरशीमुळे होतो. साधारणपणे ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये आर्द्रतायुक्त हवामानामध्ये या रोगाची सुरुवात. जमिनीलगतच्या पानावर होऊन तो वरील पानावर पसरतो. या रोगाची तीव्रता वाढत गेल्यास हे ठिपके एकत्र येऊन संपूर्ण पान करपते. त्यासाठी लिफ ब्लॉच या रोगासाठी बुरशीनाशकांची फवारणी घेतल्यास रोग आटोक्यात येऊ शकतो.

वरील कीड, रोग प्रतिबंधक तसेच प्रभावी उपाय म्हणून तसेच पिकांची जोमदार वाढ होऊन उत्पादन व दर्जात खात्रीशीर वाढ होण्यासाठी खालीलप्रमाणे फवारण्या घ्याव्यात.

फवारणी

१) पहिली फवारणी : (जूनमध्ये ) : हळद १ महिन्याची असताना जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १०० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (ऑगस्टमध्ये) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २५० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (सप्टेंबरमध्ये ) : थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २५० मिली + १५० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (ऑक्टोबरमध्ये ) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ३५० ते ५०० मिली + २०० ते २५० लि. पाणी.

सप्तामृत, हार्मोनी फवारण्याचे फायदे : पहिल्या फवारणीमुळे उगवून आलेल्या कोंबाची मर होत नाही. तसेच रोगापासून संरक्षण होऊन वाढ चालू होते. दुसर्‍या व तिसर्‍या फवारणीमुळे हळदीचा फुटवा होऊन पाने रुंद, चमकदार आणि तजेलदार तयार होतात. तसेच कंद वाढीस लागून हळद लागत (सडत) नाही. तिसर्‍या फवारणीमुळे कंद पोसून फण्यांची संख्या, आकारात वाढ होऊन एकंदरीत उत्पादन व दर्जात वाढ होते.

जर्मिनेटर, प्रिझममुळे हळदीची वाढ झपाट्याने होऊन मर किंवा हळद लागणे यावर प्रतिबंध होतो. थ्राईवर, क्रॉंपशाईनर, हार्मोनीमुळे पानांवर करपा, ठिपके येत नाहीत, तसेच वेडीवाकडी पाने सरळ व टवटवीत होतात. धोधो पाऊस, धुक्याचा त्रास होत नाही. राईपनर, न्युट्राटोनमुळे हळदीच्या फणींची संख्या, आकार, वजन व गर वाढून गर्द रंगाची दर्जेदार हळद उत्पादन घेता येते.

काढणी : हळद लागवडीमध्ये अतिशय महत्त्वाची आणि शेतकरी बंधूना खर्‍या अर्थाने क्लिष्ट वाटणारी बाब म्हणजे काढणी होय. चांगल्या उत्पादन देणार्‍या हळद पिकाची काढणी ८.५ ते ९ महिन्यांनी करावी. पक्क झालेल्या हळद पिकाच्या झाडाला पाला जमिनीच्या मगदूरानुसार पिकाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ६० ते ८० टक्केच वाळला जातो. अशावेळी झाडाचा पाल जमिनीलगत धारदार विळ्याने कापून घ्यावा. त्यानंतर जमीन थोडीशी भेगाळून घ्यावी आणि कुदळीच्या सहाय्याने हळद काढणी करावी. काढणी करताना जेठे गड्डे, हळकुंडे, सोर गड्डा अशी प्रतवारी करावी. काढणीनंतर हळकुंडे तसेच बियाणे त्वरीत सावलीच्या ठिकाणी हलवावे.

हळद शिजवण वाळविणे व पॉलिश करणे

हळद शिजवताना सच्छिद्र वापर करून हळद शिजविणे फायदेशीर ठरते. या पद्धतीमध्ये डिझेलच्या बॅरलपासून बनविलेले १.५ फूट उंचीचे व २ फुट व्यासाचे ४ते ५ सच्छिद्र ड्रम ५ फुट व्यासाच्या मोठ्या कढईमध्ये पाणी ओतून पाण्याची आतील पातळी ड्रमच्या उंचीच्या वर ४ ते ५ से.मी. इतकी ठेवली जाते. नंतर ड्रम जाड गोणपाटाने झाकून घेतले जातात. या पद्धतीने हळद फक्त २५ ते ३० मिनिटात चांगल्या प्रकारे शिजते. त्यावेळी पाण्याचे तापमान ९० डी. ते १०० डी. सेंटीग्रेट असते. हळद शिजल्यानंतर चुलवानामध्ये इंधन टाकण्याने प्रमाण कमी केले जाते. त्यामुळे आपोआप पाण्याचे तापमान कमी होते. शिजलेल्या हळदीचे ड्रम लांब बांबूच्या सहाय्याने २ कड्यामध्ये असकून २ व्यक्तिंकडून सहजासहजी उचलून वाळविण्यासाठी खळ्यामध्ये अथवा कठीण जागेवर टाकावे. असे रिकामे झालेले ड्रम पुन्हा कच्च्या हळदीने भरून काहीलीतील गरम पाण्यात ठेवतात.

पाण्याची पातळी पुन्हा ठेवलेल्या ड्रमवर ४ ते ५ सेंमी राहील इतकी ठेवली जाते. ठेवलेले ड्रम वरीलप्रमाणे गोणपाटात झाकतात व परत इंधन टाकून त्याच पद्धतीने हळद शिजविली जाते.

वरील पद्धीतमध्ये एका ड्रममध्ये सुमारे ५५ ते ६० किलो याप्रमाणे एका वेळी जवळ जवळ २५० ते ३०० किलो हळद शिजविली जाते. प्रत्येक वेळी जुन्या पद्धतीप्रमाणे गरम पाणी काढून टाकणे आणि पुन्हा नवीन पाणी टाकणे ही प्रक्रिया करावी लागत नाही. दुसरे हळद भरलेले ड्रम काहिलीत ठेवलेले असता पाण्याचे तापमान ८३ डी. ते ८४ डी. सेंटीग्रेडपर्यंत खाली येते. त्यामुळे पहिले ड्रम काढल्यानंतर दुसर्‍या घेतलेल्या ड्रममधील हळद शिजविण्यासाठी लागणारे इंधन हे तापमान ८४ ते १०० डी. सेंटीग्रेटपर्यंत वाढविण्यासाठी लागेल इतकेच असते. त्यामुळे इंधनाची बचत होते. तसेच सर्व हळद एकसारखी शिजली जाते. शिजताना पाण्यातील माती हळकुंडावर न बसता काहिलीत जमा होते. त्यामुळे इंधनाची बचत होते. तसेच सर्व हळद एकसारखी शिजली जाते. त्यामुळे मातीविरहीत स्वच्छ धुतलेली हळद मिळते. अशा हळदीस वाळविल्यानंतर पॉलिश केल्यास आकर्षक रंग प्राप्त होतो आणि उताराही चांगला मिळतो. अशा हळदीची गुणवत्ता चांगली असल्याने बाजारभावही चांगला मिळतो. अशा या वेळ, इंधन व मजुरी यांची बचत करणार्‍या व किफायतशीर नफा मिळवून देणार्‍या सुधारीत तंत्राचा पारंपारिक पद्धतीत थोडाफार खर्च करून अवलंब नक्कीच फायदा होईल.

हळद वाळविणे

हळद शिजविल्यानंतर सुरुवातीचे ४ ते ५ दिवस ३ ते ४ इंचापेक्षा मोठा थर देऊ नये. मोठा थर दिल्यास हळकुंड वाळण्यास उशीर लागतो. त्याचप्रमाणे हळकुंड काळी पडतात. हळकुंडे साधारणपणे ८ ते १० दिवस उन्हात चांगली वाळवावी, वाळलेली हळद पाण्याने भिजाणार नाही याची दक्षता घ्यावी. हळद शक्यतो तोडपत्रीवरती किंवा कठीण जागेवरती वाळवावी, त्यामुळे मजुरीवरती होणारा खर्च कमी होईल.

पॉलिश व प्रतवारी करणे

वाळलेली हळद विक्रीसाठी मार्केटला पाठविण्यापूर्वी पॉलिश करणे अत्यंत आवश्यक असते. हळद पॉलिश करणे म्हणजे वाळलेल्या हळकुंडावरची खरबरीत साल काढून टाकणे होय. पॉलिश करण्यासाठी ऑईलच्या बॅरलला १.२ ते २ इंच अंतरावरती छन्नीने भोक पाडून हा बॅरल लोखंडी कन्यावरती फिट करून हा पॉलिश ड्रम स्टँडवर बसवून फिरविल्यास हळकुंडाची वरची साल निघून जाते व हळद पॉलिश होते. हेच काम १ एच. पी. सिंगल फेज मोटारवरती चालणार्‍या लाकडी अष्टकोणी ड्रमवरतीच करता येते. हळद पॉलिश केल्यानंतर प्रतवारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी मोठे हळकुंड, मध्यम, लहान कणी, त्याचप्रमाणे गड्डे, सोरा गड्डा अशी वेगवेगळ्या प्रकारामध्ये प्रतवारी करून तयार माल विक्रीसाठी मार्केटला पाठवावा. पतवारी न करता विक्रीस पाठविल्यास मालास योग्य भाव मिळत नाही, परिणामी आर्थिक नुकसान होते.

उत्पादन

हळदीचे उत्पादन हे वापरलेली जात, निरोगी बियाणे, दिलेली खते, जमिनीचा प्रकार यावर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे ओल्या हळदीचे प्रति हेक्टरी २५० ते ३५० क्विंटल (+ २५ ते ३० क्विंटल गड्डे ) इतके उत्पादन मिळते. तसेच या ओल्या हळदीपासून ५८ ते ७५ क्विंटल वाळलेली हळद मिळते.