Pages

मित्रांनो आपल्याला माहिती आहेच कि पिकासाठी लागणारी मुख्य अन्नद्रव्ये म्हणजे NPK. आपण पिकासाठी याचा सातत्याने वापर करत आलोय पण खरंच आपल्याला ...

एनपीके (NPK) म्हणजे काय? तसेच पिकातील महत्व व फायदे!

No comments:
 

मित्रांनो आपल्याला माहिती आहेच कि पिकासाठी लागणारी मुख्य अन्नद्रव्ये म्हणजे NPK. आपण पिकासाठी याचा सातत्याने वापर करत आलोय पण खरंच आपल्याला या (नत्र, स्फुरद आणि पालाश) अन्नद्रव्यांचे कार्य किंवा त्यांचा आपल्या पिकासाठी काय फायदा होतो माहिती आहे का? यासाठीच आपण आजच्या या लेखद्वारे जाणून घेणार आहोत. चला तर मग सविस्तर पहा.








 NPK म्हणजे काय? 

➡️ नायट्रोजन (N), फॉस्फोरस (P) पोटॅशिअम (K). 

NPK हे पिकाच्या वाढीसाठी महत्वाचे पोषक घटक असून त्याची पिकांना गरज असते हे घटक शेतातील मातीतून मिळत असतात त्याच बरोबर आपण काही रासायनिक आणि सेंद्रिय खताद्वारे हि देण्यात येतात. हे घटक इतके महत्वाचे असतात कि यांच्याशिवाय पिकांची नीट वाढ होऊ शकत नाही. NPK मधला प्रत्येक घटक वेगवेगळी जबाबदारी पार पाडत असतो. ती आपण आता खालील प्रमाणे विस्तृतरित्या पाहू. 

नत्र Nitrogen (N): ➡️ पिकातील नायट्रोजनच्या योग्य उपलब्धतेनुसार पिकातील हरितद्रव्यांचे प्रमाण वाढते. तसेच लूसलुसीत तजेलदार ठेवण्याचे काम नायट्रोजन करतो. तसेच नायट्रोजनमुळे पिकांची शाखीय वाढ मोठ्या प्रमाणात होते. 

स्फुरद Phosphorus (P) : ➡️ स्फुरद हा घटक पिकांच्या मूळ वाढीसाठी त्याच बरोबर फुलं आणि फळं वाढीसाठी गरजेचं असतो. ➡️ पिकातील फोस्फारसच्या उपलब्धतेमुळे पिकांच्या मुळांची वाढ चांगली होते. ➡️ पिकास फुटवे मोठ्या प्रमाणात फुटतात. त्याचबरोबर पिकाच्या खोडाला चांगली ताकद येते. त्यामुळे झाड पडत नाही किंवा कोलमडत नाही. ➡️ नैसर्गिकरित्या फळे व्यवस्थित पिकण्यात मदत होते. ➡️ पिकाची रोगरीत्या शक्ती वाढवून पिकाची मुळावरील डायझोबियमच्या गाठी वाढविण्यास मदत होते. 

पालाश Potassium (K) ➡️ पिकांच्या पानामध्ये छोटे-छोटे छिद्र असतात हि छोटी छिद्र प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी उघड – बंद होत असतात ज्याच्या वाटे पिके कार्बन डायॉक्साइड घेऊन आक्सीजन तयार करण्याचे काम करत असतात. पिकांना पालाश योग्य प्रमाणात दिल्यास हि छोटी छिद्र योग्य प्रकारे उघड-बंद होतात आणि प्रकाश संश्लेषण क्रियेचे काम योग्य प्रकारे होते. या पाना वाटे तयार झालेले अन्न योग्य त्या ठिकाणी पोहोचवण्याचे कार्य पालाश करत असते. त्याचबरोबर झाडाची अन्न तयार करण्यासाठी क्षमता वाढते. ➡️ उदा. ऊसाच्या पानांमधून तयार झालेले अन्न उसाच्या पेरा मध्ये रूपांतरित होते. पालाश योग्य प्रमाणात पिकास मिळाल्यास फळ आणि बिया उत्तम प्रतीच्या बनत असतात. पालाशमुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते. 

No comments:

Post a Comment