Pages

 ट्रायकोडर्माचा वापर असा करा.. • प्रति किलो बियाणे दराने 6-10 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर मिसळून बियांनामध्ये मिश्रण करावे लागणार आहे. • नर्सरी...

 ट्रायकोडर्माचा वापर असा करा..




• प्रति किलो बियाणे दराने 6-10 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर मिसळून बियांनामध्ये मिश्रण करावे लागणार आहे.

• नर्सरीमध्ये ट्रायकोडर्माच्या 10-25 ग्रॅम प्रति चौरस मीटर दराने मातीवर उपचार करण्यासाठी कडुनिंब खळी, केचुआन खत किंवा पुरेसे सडलेले शेणखत मिसळा. 

•शेतात गांडूळ खत किंवा शेणखत घालताना त्यात ट्रायकोडर्मा चांगले मिश्रण करावे लागणार आहे. ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम आणि 100 ग्रॅम सडलेल्या शेणखताचे प्रति लिटर पाण्यात विरघळून झाडाचे मूळ बुडवून त्याची लागवड केली जाते. त्यामुळे वनस्पतीची वाढ जोमात होते शिवाय रोगापासून बचाव होतो 

• उभ्या पिकात ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात विरघळवून मुळाजवळ ठेवतात.

 • मातीमधील जैविक रोगांना प्रतिबंध करण्याची एक यशस्वी व परिणामकारक पद्धत आहे. • यामुळे मूळ सडणे, खोड सडणे, फळांचा सडणे इत्यादी रोगांवर नियंत...

 • मातीमधील जैविक रोगांना प्रतिबंध करण्याची एक यशस्वी व परिणामकारक पद्धत आहे. • यामुळे मूळ सडणे, खोड सडणे, फळांचा सडणे इत्यादी रोगांवर नियंत्रण ठेवते. 






• ट्रायकोडर्मा हा जैविक पद्धतीतील सर्वात प्रभावी आणि यशस्वी रोग नियंत्रक आहे. 

• ट्रायकोडर्मा बीजाच्या उगवणीच्या वेळी बियाण्यातील हानिकारक बुरशीचे आक्रमण व परिणाम रोखतो यामुळे बियांचा नाश होत नाही.

• ट्रायकोडर्मामुळे जमिनीत उपलब्ध असलेल्या वनस्पती, गवत आणि इतर पिकांच्या अवशेषांचे सेंद्रीय खतात विघटन होण्यास मदत होते. 

• ट्रायकोडर्मा हे कोणत्याही सेंद्रीय खतात आणि हलक्या आर्द्रतेमध्ये खूप चांगले कार्य करते. त्यामुळे उत्पादनात वाढ होते • हे वनस्पतीच्या चांगल्या वाढीसाठी देखील कार्य करते.

 • त्याचा प्रभाव जमिनीत वर्षानुवर्षे टिकून राहतो आणि रोगराईला आळा बसतो.

 • यामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही.



 

 












 

 


Sr. No. Product Name Forms 1 ACETOBACTER Liquid, Powder 2 ...


Sr. No.

Product Name

Forms

1

ACETOBACTER

Liquid, Powder

2

AZOTOBACTER

Liquid, Powder

3

PSB

Liquid, Powder

4

KSB

Liquid, Powder

5

KMB

Liquid, Powder

6

TRICHODERMA HARZARIUM

Liquid, Powder

7

TRICHODERMA VIRDE

Liquid, Powder

8

Pseudomonas fluorescens

Liquid, Powder

9

PSB+KSB+AZOTOBACTER

Liquid, Powder

10

PSB+KMB+AZOTOBACTER

Liquid, Powder

11

Rhizobium

Liquid, Powder

12

Verticillium

Liquid, Powder

13

Beauveria

Liquid, Powder



  जीवाणू संवर्धनाची पाकिटे सावलीत थंड ठिकाणी ठेवावे, तसेच सूर्यप्रकाश व उष्णता यांपासून संरक्षण करावे. जीवाणू खते हे जैविक घटक असल्यामुळे त्...

  1.  जीवाणू संवर्धनाची पाकिटे सावलीत थंड ठिकाणी ठेवावे, तसेच सूर्यप्रकाश व उष्णता यांपासून संरक्षण करावे.
  2. जीवाणू खते हे जैविक घटक असल्यामुळे त्याचा वापर रासायनिक खत किंवा कीडनाशकासह करू नये. 
  3. बियाण्याला किंवा बेण्याला बुरशीनाशक अथवा कीटकनाशकांची बीजप्रक्रिया करायची असल्यास अगोदर अशी प्रक्रिया पूर्ण करून, नंतर जीवाणूंची प्रक्रिया करावी.कडधान्य वर्गीय पिकासाठी गटानुसार योग्य ते रायझोबियम खत निवडावे.
  4. जैविक खत खरेदी करण्यापूर्वी, त्यावरील उत्पादन तिथी व वापराची अंतिम तिथी, वापरण्याच्या पद्धती या गोष्टी वाचून अंतिम तारखेपूर्वी संवर्धनाचा वापर करावा.


  जैविक कीडनाशक:- ट्रायकोडर्मा: ट्रायकोडर्मा ही एक प्रकारची बुरशी आहे. या बुरशीचा उपयोग जैविक कीडनाशक (बायो पेस्टिसाईड) म्हणून केला जातो.  ट...

 जैविक कीडनाशक:-

ट्रायकोडर्मा: ट्रायकोडर्मा ही एक प्रकारची बुरशी आहे.

या बुरशीचा उपयोग जैविक कीडनाशक (बायो पेस्टिसाईड) म्हणून केला जातो. 

ट्रायकोडर्माचा उपयोग बीज प्रक्रिया, मुळावर अंतरक्षीकरण तसेच जमिनीत मातीमध्ये मिसळून केला जातो. 

जैविक कीडनाशक: ट्रायकोडर्मा




प्रमाण- बीजप्रक्रियेसाठी ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे, हेक्टरी ५ किलो प्रमाणे शेणखतात मिसळून द्यावे.

  सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणारे जीवाणू:जमिनीतील उपलब्ध अशा अविद्राव्य स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्ये उदा. लोह, गंधक इ.चे उपलब्ध स्व...

 सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणारे जीवाणू:जमिनीतील उपलब्ध अशा अविद्राव्य स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्ये उदा. लोह, गंधक इ.चे उपलब्ध स्वरूपात रूपांतरण करण्याचे कार्य हे जीवाणू करतात. प्रमाण- एकरी दोन लिटर, ड्रिपद्वारे किंवा शेणखतातून.




  पालाश विरघळविणारे व वहन करणारे जीवाणू :वनस्पतींच्या पानांची जाडी व खोड, फांद्यांच्या सालीची वाढ व बलकटीकरण करण्यास पालाश हे मुख्य अन्न द्र...

 पालाश विरघळविणारे व वहन करणारे जीवाणू :वनस्पतींच्या पानांची जाडी व खोड, फांद्यांच्या सालीची वाढ व बलकटीकरण करण्यास पालाश हे मुख्य अन्न द्रव्य मानले जाते, तसेच पालाश पिकांचे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतो. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये पालाश या अन्नद्रव्यांची मुबलकता असूनही, स्थिर स्वरूपात असल्याने पिकांना उपलब्ध होत नाही. हे जीवाणू स्थिर स्वरूपातील पालाशातून जैवरासायनिक क्रियांद्वारे पालाश मुक्त करतात व पिकाला उपलब्ध करून देतात. पालाश या मूलद्रव्याचे वहन होत नाही. हे जीवाणू या पालाशची वहन क्रियाही सक्रिय करतात. प्रमाण- बीजप्रक्रियेसाठी- २५० ग्रॅम प्रति १०० किलो बियाणे, एकरी ४ किलो- शेणखतातून, एकरी २ लिटर- ड्रीपद्वारे, फळझाडांसाठी- ५० ग्रॅम प्रति झाड.




  सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे जीवाणू:पिकांची काढणी झाल्यानंतर उरलेली काडी, पाने, पाचट, पालापाचोळा यासारखे पिकांचे अवशेष हे पोषणद्रव्यां...

 सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे जीवाणू:पिकांची काढणी झाल्यानंतर उरलेली काडी, पाने, पाचट, पालापाचोळा यासारखे पिकांचे अवशेष हे पोषणद्रव्यांचे उत्तम स्रोत असतात. त्यातील काहींचे विघटन होण्यास अधिक कालावधी लागतो. या विघटन प्रक्रियेमध्ये ठराविक जीवाणूंचे योगदान असते. असे जीवाणू निसर्गतः आढळून येतात. प्रमाण- एकरी चार किलो शेणखतातून, चार किलो प्रतिटन काडी कचरा.




  ऍझोस्पिरीलम: हे जीवाणू तृणधान्य व भाजीपाला पिकाच्या मुलांमध्ये आणि मुळांवर राहून नत्र स्थिरीकरण करतात. ज्वारी व मका या पिकांमध्ये या जीवाण...

 ऍझोस्पिरीलम: हे जीवाणू तृणधान्य व भाजीपाला पिकाच्या मुलांमध्ये आणि मुळांवर राहून नत्र स्थिरीकरण करतात. ज्वारी व मका या पिकांमध्ये या जीवाणूंचा प्रभावी उपयोग दिसून येतो. 




  स्फुरद विरघळविणारे जीवाणू: स्फुरद हे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असे एक मूलभूत अन्नद्रव्य आहे. निसर्गात स्फुरद मुक्त स्वरूपात आढळून येत नाही...

 स्फुरद विरघळविणारे जीवाणू: स्फुरद हे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असे एक मूलभूत अन्नद्रव्य आहे. निसर्गात स्फुरद मुक्त स्वरूपात आढळून येत नाही. परंतु खनिजे, प्राण्यांचे अवशेष, खडक इ.मध्ये आढळतो. हे अन्नद्रव्य जमिनीत विरघळण्यास कठीण असून, शिफारशीप्रमाणे दिलेल्या स्फुरदयुक्त खतांचा उपयोग पूर्णपणे होऊ शकत नाही. स्फुरद विरघळविणारे जीवाणू न विरघळलेल्या स्थिर स्फुरदाचे पिकांना उपलब्ध अशा रासायनिक स्वरूपात रूपांतर करतात. 

प्रमाण- बीजप्रक्रियेसाठी- २५० ग्रॅम प्रति१० किलो बियाणे, एकरी ४ किलो- शेणखतातून, एकरी २ लिटर –ड्रीपद्वारे, फळझाडांसाठी – ५० ग्रॅम प्रति झाड.



ऍझोटोबॅक्टर :  हे जीवाणू पिकाच्या मुळावर गाठी न बनवता असहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करतात, तसेच हे जीवाणू बीजांकुरण व पीक वाढीसाठी उपयुक्त...

ऍझोटोबॅक्टर : 

हे जीवाणू पिकाच्या मुळावर गाठी न बनवता असहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करतात, तसेच हे जीवाणू बीजांकुरण व पीक वाढीसाठी उपयुक्त अशा काही रसायनांचा (उपयुक्त) स्राव तयार करतात. काही रासायनिक तत्त्व बुरशीनाशक तसेच कृमिनाशक म्हणूनही कार्य करतात. या जीवाणूंचा उपयोग एकदल व तृणधान्य पिके उदा. ज्वारी, मका, कापूस, बाजरी, मिरची, सूर्यफूल, वांगी, डाळिंब इत्यादी पिकांमध्ये होतो. 

 


प्रमाण – बीजप्रक्रियेसाठी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे, एकरी ४ किलो- शेणखतातून, एकरी २ किलो – ड्रीपद्वारे, फळझाडांसाठी- ५० ग्रॅम प्रति झाड. 

  रायझोबियम : या जिवाणूंचे कार्य सहजीवी पद्धतीने चालते.  हे जीवाणू कडधान्यवर्गीय पिकांच्या मुळामध्ये स्थिर होऊन गाठी बनवतात.  मुळावर वाढलेले...

 रायझोबियम:

या जिवाणूंचे कार्य सहजीवी पद्धतीने चालते. 

हे जीवाणू कडधान्यवर्गीय पिकांच्या मुळामध्ये स्थिर होऊन गाठी बनवतात. 

मुळावर वाढलेले जिवाणू हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून पिकांना उपलब्ध करून देतात. 

एकाच प्रकारचे रायझोबियम जीवाणू खत सर्व शेंगवर्गीय पि


कांना उपयोगी पडत नाहीत. 

त्यामध्ये वेगवेगळे सात गट आहेत. 

वेगवेगळ्या गटातील विशिष्ट पिकांना त्याच गटाचे रायझोबियम जिवाणू खत वापरावे. 


चवळी गट – तूर, भुईमूग, बाग, चवळी, मूग, उडीद इत्यादी हरभरा गट – हरभरा वाटाणा गट – वाटाणा, मसूर घेवडा गट – घेवडा सोयाबीन गट – सोयाबीन अल्फा- अल्फा गट – अल्फा- अल्फा, मेथी, लसूण घास बरसीम गट – बरसीम प्रमाण – 

बीज प्रक्रियेसाठी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे.


  जैविक खतांमुळे रासायनिक खताचा कार्यक्षम वापर होऊन, त्यात बचत होऊ शकते.  जैविक खते पर्यावरणपूरक आहेत.  जैविक खतांमुळे बियाण्याची उगवणशक्ती ...

  1.  जैविक खतांमुळे रासायनिक खताचा कार्यक्षम वापर होऊन, त्यात बचत होऊ शकते. 


  1. जैविक खते पर्यावरणपूरक आहेत. 
  2. जैविक खतांमुळे बियाण्याची उगवणशक्ती वाढते. 
  3. जैविक खते सूक्ष्म अन्नद्रव्ये याबरोबरच जिब्रेलिक ऍसिड, सायटोकायनिन इन्डॉल ऍसिटीक ऍसिड, यासारखे संप्रेरके व विटामीन बी’ झाडाला मिळवून देतात.
  4. जैविक खतांद्वारे जमिनीत प्रतिजैविके सोडली गेल्याने काही प्रमाणात बुरशीजन्य रोग यांचेदेखील नियंत्रण होते. 
  5. जैविक खते वापरल्याने जमिनीचा पोत सुधारतो.
  6. उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते, तसेच उत्पादन खर्च कमी होतो.


निसर्गतः जमिनीमध्ये जीवाणू, बुरशी सारखे असंख्य उपयुक्त सूक्ष्मजीव आढळून येतात. हे जीवाणू जमिनीमध्ये अन्नद्रव्य व इतर उपयुक्त घटक पिकाला उपलब...

निसर्गतः जमिनीमध्ये जीवाणू, बुरशी सारखे असंख्य उपयुक्त सूक्ष्मजीव आढळून येतात. हे जीवाणू जमिनीमध्ये अन्नद्रव्य व इतर उपयुक्त घटक पिकाला उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात.जीवाणूंचे प्रमाण अधिक असलेल्या मातीला जिवंत माती असे म्हटले जाते. मातीची सुपीकता व उत्पादकता वाढविण्यासाठी या उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढणे गरजेचे आहे.

जैविक खते म्हणजे काय? : 

प्रयोगशाळेत उपयुक्त कार्यक्षम जीवाणूंची स्वतंत्ररीत्या वाढ करून योग्य वाहकता मिसळून तयार होणाऱ्या मिश्रणाला जीवाणू खत’, जीवाणू संवर्धन’, बॅक्टेरीयल कल्चर’ किंवा बॅक्टेरियल इनॉक्युलंत म्हणतात. नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म मूलद्रव्ये पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि सूक्ष्म अशा उपयुक्त जीवाणूंचा वापर करता येतो, त्यांना जैविक खते असे म्हणतात. शेतात असणाऱ्या सेंद्रिय पदार्थांचा जलदरीत्या विघटनासाठी ते उपयुक्त ठरतात.